BUDGET 2018 : इन्कम टॅक्स आणि इतर 10 महत्त्वाच्या तरतुदी

Jetali

लोकसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केंद्रीय बजेट आज लोकसभेत सादर केलं. गेल्या वर्षीप्रमाणे रेल्वे बजेट हे मुख्य बजेटचाच एक भाग होता. इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. बजेटसंदर्भातल्या घडामोडी, तरतुदी प्रतिक्रिया याविषयीचे एकत्रित अपडेट्स इथे वाचू शकता.

आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत 2018-19चा अर्थसंकल्प सादर केला. 2019च्या निवडणुकांपूर्वी सादर केलेलं हे मोदी सरकारचं शेवटचं पूर्ण बजेट होतं.

अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा

1. यंदाच्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वेतनधारकांसाठी 40 हजार पर्यंत स्टॅंडर्ड डिडक्शन लावण्यात येणार आहे. म्हणजे वेतनाच्या रकमेतून 40 हजार रुपये वजा करून उरणाऱ्या रकमेवर कर लागेल.

2. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सेस म्हणजे अधिभार 3 टक्क्यांवरून वाढून 4 टक्के झाला.

3. एक लाखापेक्षा अधिकच्या गुंतवणुकीवर 10 टक्के कॅपिटल गेन टॅक्स लागणार.

4. मनोरंजनाच्या साधनांवरील कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे मोबाईल, टीव्ही महागणार.

5. आगामी वर्षात 70 लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय.

6. 8 कोटी गरीब कुटुंबाना मोफत गॅस जोडणी देणार.

7. राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजनेअंतर्गत 10 कोटी गरीब कुटुंबाना 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळणार.

8. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव मिळणार.

9. राष्ट्रपतींचं वेतन पाच लाख रुपये, उपराष्ट्रपतींचं चार लाख रुपये आणि राज्यपालांचं साडे तीन लाख रुपये करण्यात येईल. खासदारांचं वेतनही वाढणार आणि दर पाच वर्षांनी खासदारांना देण्यात येणाऱ्या भत्त्याची समीक्षा होणार.

10. 250 कोटींपर्यत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांवर 25 टक्के कर लागणार.

इथे पाहा बजेटचं भाषण


17.30 : बजेटविषयी तरुणाईला काय वाटतं?

या वर्षीच्या बजेटविषयी सर्वसाधारण तरुणाईला काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीनं मुंबईतल्या काही तरुण मुला-मुलींशी संवाद साधला. हे तरुण काय म्हणताहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

15.15 : बजेटमधल्या रेल्वे तरतुदींविषयी रेल्वे प्रवासी संघटनेची प्रतिक्रिया

बजेटविषयी विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत.


14.46 : शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत बजेटवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

 • निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेले हे बजेट आहे.
 • त्याचा उल्लेख मुंगेरीलाल के हसीन सपने असा करता येईल.
 • शेतकऱ्यांना आजही पूर्ण कर्जमाफी मिळालेली नाही.
 • नोकरदारांना काहीही मिळालेलं नाही.

14.25 : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक बजेटविषयी...

 • कोणतंही बजेट हे सगळ्यांच्या सगळ्याच अपेक्षा पूर्ण करणारं नसतं.
 • तरतुदी भरीव आहेत पण अंमलबजावणी कशी करणार याबाबत शंका आहेत.

14.00 : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांची प्रतिक्रिया

अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचं दिसतं. पण शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागाच्या समस्या अनेक आहेत. तरतुदी पुरेशा ठरणार नाहीत.


13.50 : काँग्रेसची टीका

स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस, अशा शब्दांत खासदारअशोक चव्हाण यांची बजेटवर टीका.

 • आमचं सरकार असताना MSPमध्ये 150 टकके वाढ झाली होती. तीन वर्षांच्या काळात 2 टक्के वाढ झाली.
 • शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांच उत्पन्न कसं वाढवणार? हे सांगत नाही.
 • पेट्रोल, डिझेलवर ठोस निर्णय होईल असं वाटत होतं. सरकारला काही गांभीर्यचं नाही.
 • महागाई वाढतं चालली आहे. आज डिजीटल इंडियाच्या गप्पा मारतात आणि लॅपटॉवर ड्यूटी वाढविली आहे.
 • हॉस्पिटलचं बील सात-आठ लाखांच्या खाली येत नाही. ओपन हार्ट सर्जरी करावी लागते. काय होणार?
 • पाच लाख तरतुद केली आनंदाची गोष्ट आहे. पण तीच सात-आठ लाख केली असते तर आनंद झाला असता ना.
 • ही योजना वरवरची बरी दिसते आहे. प्रत्यक्ष प्रिमियम किती भरणार हे माहीत नाही.

13.35 : 'न्यू इंडियाला मजबूत करणारं बजेट' - मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -

 • हे बजेट न्यू इंडियाला मजबूत करणारं बजेट आहे.
 • देशाच्या विकासाला गती देणारं बजेट आहे.
 • कृषीपासून पायाभूत सुविधांपर्यंत बजेट आहे. शेतकरीपूरक बजेट आहे.
 • गरीब आणि मध्यवर्गीयांसाठी आरोग्याच्या योजना आणल्या आहेत. छोट्या उद्योजकांसाठी संपत्ती वाढविणारी योजना आहे.
 • देशाच्या विकासाला प्रोत्साहन देणारं बजेट आहे.
 • गाव आणि कृषी क्षेत्रासाठी 14.50 लाख कोटीची तरतुद, 51 लाख नवीन घर, 3 लाख किलोमीटरहून अधिक रस्ते, 2 कोटी संडास बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
 • रोजगाराच्या नवीन संधी घेऊन येणार आहे.
 • शेतकऱ्यांना या निर्णयांचा लाभ मिळावा.
 • 'गोबर धन योजना गाव स्वच्छ' ठेवण्याबरोबरच शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती सुधारण्यास मदत होईल.

13.30 : वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी बजेटचं स्वागत केलं

वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांचं या क्रांतिकारी आणि सामान्य नागरिकांचं आयुर्मान उंचावणारं बजेट सादर केल्याबदद्ल अभिनंदन केलं आहे.


13.23 : पी. चिदंबरम यांची बजेटवर टीका

अर्थमंत्री वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्यात अयशस्वी झाले आहेत. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत. अशा शब्दात माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.


13.20 : नितीशकुमार म्हणतात

नितीश कुमार यांनी सरकारचं अभिनंदन केलं आहे. कृषी आणि आरोग्य क्षेत्राताल तरतुदींवर त्यांनी सरकारचं कौतुक केलं.


13.18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

हे अतिशय ऐतिहासिक बजेट आहे. गरीब शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक हे सगळ्यात मोठी लाभार्थी आहेत. आरोग्य आणि पायाभूत सुविधांना आता चालना मिळेल अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.


12.48 : बजेट भाषण संपलं

 • अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या भाषणाची 12.48 वाजता संपलं.
 • लोकसभेची कारवाई स्थगित.
 • Let us new India Arise या स्वामी विवेकानंदाच्या वाक्यानं अरुण जेटली यांनी बजेटच्या भाषणाची सांगता केली.

12.45 : सेन्सेक्स घसरला

 • सेन्सेक्स 200 अंकांनी घसरला.
 • लाँग टर्म कॅपिटल गेन - 10 टक्के
 • एक लाखावर दहा टक्के कॅपिटल गेन टॅक्स
 • शॉर्ट टर्म गेन 15 टक्के
 • मोबाईल फोनवर एक्साईज ड्युटी आधीच्या १५वरून आता २० टक्के इतकी वाढवली.

12.40 : थोडा दिलासा

 • स्टँडर्ड डिडक्शन पुन्हा लागू, 40 हजार रुपयांचं
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींवर 50 हजारांपर्यंतचं व्याज करमुक्त

12.30 : इन्कम टॅक्समध्ये बदल नाही

 • इन्कम टॅक्समध्ये कोणताही बदल नाही.
 • प्रत्यक्ष करात 12.6 टक्क्यांनी वाढ
 • Presumptive income scheme अंतर्गत रिटर्न भरणाऱ्या लोकांमध्ये 41 टक्क्यांनी वाढ
 • 19.25 लाख नवीन करदाते
 • कर भरणाऱ्या लोकांमध्ये 6.47 कोटीपासून 8.27 कोटींपर्यंत वाढ

12.28 : वित्तीय तुटीचं लक्ष्य 3.3 टक्के

 • वित्तीय तूट राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.3 टक्के ठेवण्याचं लक्ष्य
 • थेट करांच्या माध्यमातून झालेली वसुली 12 टक्क्यांनी वाढली

12.25 : गांधी जयंती

 • गांधीजींच्या 150व्या जयंतीसाठी 1500 कोटींची तरतूद
 • खासदार निधी आणि खासदारांचा पगार यांचा आढावा घेण्यासाठी एक समिती नेमणार

12.24: पगारवाढ

 • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा पगार वाढला
 • राष्ट्रपतींना आता महिन्याला पाच लाख, उपराष्ट्रपतींना 4 लाख आणि राज्यपालांना 3.5 लाख पगार

12.15 : आणखी घोषणा

 • 42 अत्याधुनिक मेगा फुड पार्क उभारणार
 • बंगऴुरू मेट्रोसाठी 17000 कोटीची तरतूद
 • उद्य़ोगांसाठी युनिक आयडी क्रमांक, विशेष ओळख क्रमांक
 • बँक निर्गुंतवणूक 80 हजार कोटी उभे करणार

12.10 : भारतनेट

 • रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षणासाठी तरतूद वाढली.
 • भारतनेट योजना अंतगर्त 1 लाख गावांना इंटरनेट सुविधा
 • क्रिप्टो करन्सीसाठी ब्लॉकचेन प्रणाली वापरण्यावर विचार करणार
 • पण, क्रिप्टो करन्सीला प्रोत्साहन देणार नाही
 • टोल प्लाझांमध्ये ई पेमेंट, टोल भरता येणार ऑनलाईन
 • ग्रामीण भागातील पाच कोटी लोकांना वाय-फाय हॉट स्पॉटद्वारे इंटरनेट सुविधा देणार

12.07 : हवाई क्षमता

 • हवाई क्षमता पाचपट वाढवणार
 • देशांतर्गत हवाई वाहतुकीसाठी उडान योजना
 • उडान योजनेअंतर्गत 56 न वापरलेल्या विमानतळांचा आणि 31 हेलिपॅड्सचा विकास करणार
 • 'हवाई स्लीपर घालणारे आता उडान योजनेअंतर्गत 'हवाई सफर' करू शकतील' - जेटली

12.05 : रेल्वेचा विस्तार

 • रेल्वे योजना - 1,48,528 कोटी रुपयांची तरतूद
 • रेल्वे विद्युतीकरणावर भर
 • रेल्वेत प्रवासी सुरक्षेवर भर देणार
 • 3600 किमी ट्रॅकचं नुतनीकरण
 • मुंबई लोकलचा विस्तार, 150 किली लांबीचा ट्रॅक वाढणार
 • 90 किमी ट्रॅक दुहेरीकरण
 • बुलेट ट्रेनसाठी बडोद्यात प्रशिक्षण केंद्र
 • ट्रेन्समध्ये वायफाय, सीसीटीव्हीची सुविधा वाढवणार

12.02 : आयकॉनिक स्थळ

 • 10 पर्यटन स्थळांचा आयकॉनिक स्थळ
 • 10 स्मारक स्थळ म्हणून पर्यटन विकास करणार

11.59 : पायाभूत क्षेत्र

 • पायाभूत क्षेत्रासाठी आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद
 • पायाभूत सुविधांसाठी 50 लाख कोटींची गुंतवणूक

11.58 : EPFमध्ये 12 टक्के सरकारचा वाटा

 • EPFमध्ये 12 टक्के सरकारचा वाटा
 • नवीन रोजगार निर्मिती 70 लाख
 • कौशल्य विकासासाठी 306 पंतप्रधान कौशल्य केंद्रांची निर्मिती
 • कापड उद्योगासाठी 7148 ची तरतूद

11.52 : लघू आणि मध्यम उद्योग

 • 3794 कोटी रुपये लघू आणि मध्यम उद्योगांसाठी
 • मुद्रा योजनेसाठी 3 लाख कोटी रुपये कर्ज उपलब्ध करणार

11.48 : नमामि गंगे

 • सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत 1.26 कोटी अकाऊंट
 • नमामि गंगे योजनेतली 47 कामं पूर्ण झाली
 • 115 नवीन जिल्ह्यांचा करणार विकास
 • 56,619 कोटी रुपये SC विकासासाठी
 • 4465 गंगा ग्राम खेडी हागणदारीमुक्त

11.46 : जनधन योजनेचा विस्तार

 • जनधन योजनेचा विस्तार करुन या खातेधारकांना मायक्रो कर्ज

11.44 : आयुष्यमान भारत योजना

 • आयुष्यमान भारत योजने अंतर्गत दोन योजना
 • 1- आरोग्य केंद्रांसाठी 1200 कोटी
 • 2- राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना
 • 10 लाख लोकांना मिळणार फायदा
 • 5 लाखांचं हॉस्पिटल संरक्षण

11.40 : आरोग्य - जगातला सगळ्यात मोठा कार्यक्रम

 • 1200 कोटी आरोग्य केंद्रांसाठी
 • राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना
 • 50 कोटी लोकांना मिळणार फायदा
 • जगातला सगळ्यात मोठा आरोग्य कार्यक्रम
 • 600 कोटी क्षयरोगाच्या रुग्णांसाठी मिळणार
 • 26 नवीन मेडिकल कॉलेजची निर्मिती

11.35 : शिक्षण

 • शिक्षणाचा स्तर उंचवण्याचा प्रयत्न
 • शिक्षण डिजिटल करण्याकडे कल, ब्लॅकबोर्ड टू डिजिटल बोर्ड
 • 13 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देणार
 • दीक्षा वेब पोर्टलला प्रोत्साहन
 • 'राईज'साठी 1 लाख कोटी, शिक्षण संस्थांच्या विकासासाठी
 • वडोदऱ्यात रेल्वे विद्यापीठ
 • 1000 बीटेक विद्यार्थांना IIT, NITमधून पीएचडीसाठी फेलोशिप देणार

11.30 : गरीब स्त्रियांना गॅस कनेक्शन

 • उज्ज्वला योजनेअंतर्गत 8 कोटी गरीब स्त्रियांना मोफत गॅस कनेक्शन देणार
 • 4 कोटी लोकांना मोफत वीज
 • सौभाग्य योजनेवरही खर्च
 • 16 हजार कोटींचा खर्च
 • 2020 पर्यंत गरीब लोकांना घर मिळावं यासाठी आवास योजना
 • स्वच्छ भारत योजनेअंतर्गत 6 कोटी स्वच्छतागृह बांधणार
 • बचतगटाला देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा 75000 कोटी करणार

11.28 : 2 नव्या योजना

 • मत्स्य पालन आणि पशूपालनासाठी 2 नव्या योजना
 • कृषि कर्जाची मर्यादा 11 लाख कोटी इतकी वाढवणार
 • कृषिक्षेत्राला कर्ज मिळण्याची सुविधा

11.24 : ऑपरेशन ग्रीन सुरू करणार

 • कृषि उत्पादनाचं मार्केटिंग क्लस्टर विकास पद्धतीने
 • सेंद्रीय कृषि उत्पादनांना प्रोत्साहन
 • कृषिसंपदा योजना अन्न प्रक्रिया व्यवसायासाठी आणणार
 • ऑपरेशन ग्रीन सुरू करणार त्यासाठी 500 कोटी देणार
 • नॅशनल बांबू मिशनसाठी 1290 कोटी
 • कृषि निर्यातीचं लक्ष्य एक हजार कोटी रुपयांचं

BUDGET 2018 LIVE : इन्कम टॅक्समध्ये बदल नाही, सेन्सेक्स घसरला

11.22 : दोन्ही भाषांत भाषण

 • अरुण जेटलीचं हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांतून भाषण

11.20 : कृषी आणि ग्रामीण धोरण

 • किमान आधारभूत किंमतीत वाढ केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार
 • खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत दीडपटाने वाढ
 • 22000, ग्रामीण कृषी बाजारांची निर्मिती करणार
 • शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळेल यासाठी
 • सगळी पीकं MSP अंतर्गत येणार
 • ग्रामीण हाटचा विकास कृषि बाजारांमध्ये होणार
 • शेतमालाच्या वाहतुकीसाठी पक्के रस्ते बांधणार

11.15 : कृषी आणि ग्रामीण धोरण

 • 2022 पर्यंत कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचं स्वप्न.
 • शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
 • शेतीकडे आम्ही एक उद्योग म्हणून बघत आहोत.
 • कृषिक्षेत्राचा एंटरप्राईजसारखा विकास करणार
 • 2016-17मध्ये 275 मिलियन टन कृषि उत्पन्न

11.12 : विकासदर 7.45% होईल

 • IMFने विकासदर 7.45% होईल असा अंदाज व्यक्त केला आहे
 • इज ऑफ डूइंग बिझिनेसपासून प्रेरणा घेत सर्वसामान्यांना रोजगार देणार
 • ओळखपत्र ऑनलाईन मिळण्याची सोय
 • तीन दिवसात पारपत्र
 • GSTमुळे अप्रत्यक्ष कर प्रणाली झाली सोपी
 • Ease of business पेक्षा आम्ही Ease of living वर जास्त भर देणार

11.08 : 7.5 विकास दर

 • पहिल्या 3 वर्षात 7.5 विकास दर राखला
 • बँकांना दिलेल्या निधीमुळे व्यवसाय वृद्धीला मदत
 • 2.5 ट्रिलियन अर्थव्यवस्था झाली
 • लवकरच पाचवी मोठी अर्थव्यवस्था होणार

11.04 : बजेटच्या भाषणाला सुरुवात

लोकसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बजेटच्या भाषणाला सुरुवात केली.


11.00 : संसदेच्या कामकाजाला सुरुवात

संसदेच्या कामकाजाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित. संसदेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचा शोकप्रस्ताव. पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांना वाहिली श्रद्धांजली.


10.50 : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली.

केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली. बैठकीत बजेटला मंजूरी. अरुण जेटली लोकसभेकडे रवाना.


10.49 : बजेटविषयी काही रंजक गोष्टी

 • आतापर्यंत 87 बजेट सादर.
 • आजवर 25 अर्थमंत्री झाले.
 • मोरारजी देसाई, चरण सिंह, व्ही पी सिंग, मनमोहन सिंग हे चार अर्थमंत्री पुढे पंतप्रधान झाले.
 • आर. व्यंकटरमण आणि प्रणब मुखर्जी हे अर्थमंत्री पुढे राष्ट्रपती झाले.

10.47 : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल


10.36 : हिंदीत बजेट

अर्थमंत्री अरुण जेटली हिंदीत मांडणार बजेट. साधारणतः बजेट इंग्रजीत मांडलं जातं.


10.35 : जेटली पोहोचले संसदेत

बजेटच्या पार्श्वभूमीवर संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक सुरू. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीही संसदेत दाखल. बजेटच्या बॅगा संसदेत पोहोचल्या.

Image copyright PRAKASH SINGH

10.30: शेअर बाजारात उसळी

आज सादर होणाऱ्या बजेटच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उसळी आलेली असून सेनसेक्स 150 अंकांनी वधारला आहे.


मोदी सरकारच्या सध्याच्या कार्यकाळातला हा शेवटचा संपूर्ण अर्थसंकल्प असणार आहे.

10.20: उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा

मला अपेक्षा आहे की, अर्थमंत्री वित्तीय तुटीचं लक्ष्य कायम ठेवतील. तसं झालं नाही तर ते दुर्दैवी असेल. प्रत्यक्ष करातून आलेल्या उत्पन्नातून चांगले निकाल हाती आले आहेत. जीएसटीच्या उत्त्पन्नातील अडथळे जीएसटी परिषदेमुळे दूर झाले आहेत. त्यामुळे सामाजिक योजनांसाठी बऱ्यापैकी तरतूद होऊ शकते.

-सुदीप्तो मुंडले, अर्थतज्ज्ञ


भारताचा विचार केला असता संपूर्ण लक्ष शेती क्षेत्रातल्या Produce, process, prosper या तीन गोष्टींवर असायला हवं. फार्मिंग 3.0 आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवणं हा वाढीचा उत्तम उपाय आहे. भारतात निश्चलनीकरण आमि जीएसटी या घटनांमुळे स्थिरतेच्या वातावरणाला एक नवं वळण मिळालं आहे. आपल्याला शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठी पावलं उचलावी लागणार आहे जेणेकरून गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल - वी. पार्थसारथी, सीएफओ, महिंद्रा ग्रुप


बजेटविषयीच्या काही रंजक गोष्टी इथे बघता येतील.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पैशाची गोष्ट : #BudgetWithBBC बजेट म्हणजे काय रे भाऊ?

कर कसा वाचवता येतो, याची पैशाची गोष्ट -

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पैशाची गोष्ट - कसा वाचवाल कर?

यंदा अर्थसंकल्पाकडून सामान्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी #BudgetwithBBC ही सीरीज केली होती.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : #BudgetWithBBC 'GST कमी व्हायला हवा'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ- अर्थसंकल्प विशेष : 'या सरकारने अच्छे नव्हे वाईट दिवस आणले आहेत'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
#BudgetWithBBC : 'पायाभूत सुविधा, शिक्षणावर अधिक लक्ष द्यावं'
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
तर 'अच्छे दिन' लवकर संपावेत...

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)