व्हिंटेज इंडिया : दुर्मीळ छायाचित्रांमधून भारत दर्शन

ताजमहाल Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारतभेटीवर आलेल्या फेलिसा बेआतो या फोटोग्राफरने 1857च्या बंडानंतर दोन वर्षांनी टिपलेला ताजमहाल.

जुने फोटो पाहणे हा आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काही दुर्मीळ छायाचित्रांतून तत्कालीन भारतीय शहरांची एक झलक दिसते.

ब्रिट्रिश काळातील हे फोटो फेलिसा बेआतो, सॅम्युअल बॉर्न अशा छायाचित्रकारांच्या कलेचीही साक्ष देतात.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा रंगीत फोटो काढण्यास सुरूवात झाली त्या काळातील, म्हणजे 1860 च्या सुमारास टिपलेला मुंबईतील गिरगावचा माहौल.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा 1856मधील मुंबई बंदर. ईस्ट इंडिया कंपनी इथून फोटो पाठवत असे. त्यासाठी त्यांनी सैन्यातील काही अधिकाऱ्यांना कॅमेराही दिला होता.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूरच्या दौऱ्यावर सन 1875-76 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स गेले होते.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सॅम्युअल बॉर्न यांनी काढलेला, गंगेच्या तिरावरील मणिकर्णिका घाटाचं हे नयनरम्य दृश्य.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दार्जिलिंग येथील बौद्ध वादकांच्या या फोटोतून त्या काळातील पहाडी आदिवासी जीवनशैलीचा अंदाज येतो.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जुन्या काळातील भारताचे चित्रण करणारे हे दृश्य आहे तिरुचिरापल्लीचे.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा श्रीरंगनाथस्वामी, तमिळ शैलीतील हा मंदिर परिसर. जगातील मोठ्या धर्मस्थळांपैकी हा एक परिसर आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)