कसं कराल विजेशिवाय मोबाईल चार्ज?

प्रकित्मक चित्र Image copyright THINKSTOCK

तुम्ही सकाळी उठता आणि बघता की मोबाईलची बॅटरी संपली आहे. चार्जिंगला लावता आणि नेमकी वीज गेलेली असते. त्यातल्या त्यात पावर बँकही डिस्चार्ज झालेली. किंवा कधी असंही झालं असेल ना की तुम्ही डोंगर-दऱ्यात फिरायला गेल्यावर फोटो काढतांना तुमच्या मोबाईलची बॅटरीच संपली.

चिंता नको. या तीन सोप्या स्टेप्स पटकन शिकलं की विजेशिवाय मोबाईल चार्ज करा!

गरजेचं सामान

एक कार युएसबी अडाप्टर (कारमधलं सिगरेट लायटर), युएसबी केबल, 9 वोल्टची बॅटरी, धातूची एक चीप आणि एक पेनाची स्प्रिंग किंवा स्क्रू आवळण्याचा पाना.

आता तुम्हाला बॅटरीतून वीज निर्माण करून मोबाईलपर्यंत पोहचवायची आहे. त्यासाठी कमी तीव्रतेचं इलेक्ट्रिकल फिल्ड निर्माण करावं लागणार आहे, ज्यानं मोबाईल चार्ज करता येईल.

Image copyright Youtube/Mundo top

पहिली स्टेप

एका बॅटरीला दोन पोल असतात - एक पॉसिटिव आणि एक निगेटिव. या दोन्ही बाजुंना जोडणाऱ्या कोणत्याही माध्यामातून विद्युत प्रवाह होतो. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला निगेटिव पोलकडे धातूची चीप लावा.

Image copyright Youtube/Mundo top

दुसरी स्टेप

कार अडाप्टरला दुसऱ्या बाजुला म्हणजे पॉसिटीव पोलला जोडा. यातून इलेक्ट्रिक फिल्ड तयार होईल.

Image copyright Youtube/Mundo top

तिसरी स्टेप

आता चीपचे टोक आणि अडाप्टरच्या धातूकडच्या बाजूला जोडा. याने बॅटरीमधील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह सुरू होऊन वीज निर्माण होण्यास सुरुवात होते.

सगळ्या बॅटरींमध्ये इलेक्ट्रोलाइट आणि रासायनिक तत्वं असतात. त्यांच्यात प्रक्रीया होऊन इलेक्ट्रॉन्स तेजीने वाहतात आणि वीज निर्माण होते.

आणि तूमचा विजेशिवाय चालणारा चार्जर तयार आहे!

Image copyright Youtube/Mundo top

हा चार्जर मोबाईलच्या चार्जिंग पॉइंट मध्ये लावा की लगेच तुमचा फोन सुरू होईल.

ही क्लृप्ती तूम्ही अटीतटीच्या वेळी वापरू शकता.