रोहिंग्या मुस्लीमांपाठोपाठ म्यानमारमधील हिंदू सुद्धा बांग्लादेशात स्थलांतरीत होत आहेत.

रोहिंग्या मुस्लीमांपाठोपाठ म्यानमारमधील हिंदू सुद्धा बांग्लादेशात स्थलांतरीत होत आहेत.

हजारो रोहिंग्या मुस्लीमांपाठोपाठ म्यानमारमधील हिंदू सुद्धा बांग्लादेशात स्थलांतरीत होत आहेत. म्यानमारमधील वांशिक हिंसेची झळ त्यांना सुद्धा बसत आहे.

म्यानमारच्या राखीन प्रांतात सतत होत असलेल्या हिंसेमुळे हजारो लोक घर सोडून पळ काढतायेत. अल्पसंख्याक रोहिंग्या मुस्लीमांपाठोपाठ आता हिंदू कुटुंबांना सुद्धा बांग्लादेश सीमेकडे स्थलांतर करण्यास भाग पडतलं जात आहे.

बौद्ध बहुल म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. रोहिंग्या आणि बौद्धांमध्ये अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

तब्बल दहा हजारांवर रोहिंग्या मुस्लीम बांग्लादेशात स्थलांतरीत झाले आहेत.म्यानमार सरकार वांशिक हिंसा घडवत असल्याचा आरोप रोहिंग्या मुस्लीम करत आहेत.

याच हिंसेला बळी पडून 400 पेक्षा जास्त हिंदुंनी घरं सोडली आहेत. यामध्ये महिला आणि बालकांची संख्या सर्वात जास्त आहे. काही हिंदुंची हत्या करण्यात आली तर काहींच्या घरांना आग लावण्यात आली.