उत्तर कोरिया : 300 शब्दांत जाणून घ्या नेमका प्रश्न

रॉकेट

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

नेमकं काय आहे उत्तर कोरिया प्रकरण?

उत्तर कोरियाच्या संदर्भातील परिस्थिती बिकट आहे. अगदीच स्थिती बिघडली तर अण्विक युद्धाचा धोका आहे. पण हे वाटत तितक सोपं नाही आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय?

उत्तर कोरियाला अण्वस्त्रे का हवीत?

दुसऱ्या महायुद्धानंतर कोरियन द्विपकल्पाचे विभाजन झाले. कम्युनिस्ट प्रभावाखाली उत्तर कोरियात हुकूमशाही आकाराला आली. उत्तर कोरिया जागतिक पटलावर जवळपास पूर्णपणे एकटा पडला आहे. आम्हाला संपवू पाहणाऱ्या जगाविरुद्ध फक्त अण्वस्त्रंच आमचं संरक्षण करू शकतात, असं उत्तर कोरियाच्या नेतृत्वाला वाटते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन

अण्वस्त्रांची निर्मिती कितपत?

उत्तर कोरियाने हायड्रोजन बाँबची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. हा बाँब अणुबाँबपेक्षा बराच शक्तिशाली आहे, तसंच तो दूरच्या पल्ल्यावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांवर बसवता येईल, असा ही उत्तर कोरियाचा दावा आहे. या देशाच्या सरकारी माध्यमांनी ही चाचणी अचूकरित्या यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे.

काही विश्लेषकांना हे दावे काळजीपूर्वक घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. गोपनीय माहितीनुसार अमेरिकेतील गुप्तचर अधिकारीही मान्य करतात की उत्तर कोरियाकडे हे बाँब लहान स्वरुपात साकरण्याची क्षमता आहे.

उत्तर कोरिया अमेरिकेला मुख्य शत्रू मानते. पण उत्तर कोरियाकडे दक्षिण कोरिया आणि जपानच्या रोखानं रॉकेट आहेत. या दोन्ही देशांत अमेरिकेचे सैन्य तैनात आहे.

उत्तर कोरियाला थांबवण्यासाठी काय झाले आहे?

निशस्त्रीकरणाच्या बदल्यात मदत देण्याच्या वाटाघाटी सातत्याने अपयशी ठरलेल्या आहेत.

संयुक्त राष्ट्रांनी सातत्याने उत्तर कोरियावर कठोर निर्बंध लादले आहेत. पण त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. उत्तर कोरियाचा एकमेव मित्र असलेल्या चीनने सुद्घा उत्तर कोरियावर आर्थिक आणि राजकीय दबाव टाकला आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)