लावा डोकं : कोण खोटं बोलत आहे?

आजचं कोडं सोडवू शकता का?

Image copyright Getty Images

कोण खोटं बोलतं आहे सांगा? गुड लक.

जॉन म्हणतो की, जस्टिन खोटं बोलतो आहे.

जस्टिन म्हणतो की, टॉम खोटं बोलतो आहे.

टॉम म्हणतो की, जस्टिन आणि जॉन दोघंही खोटं बोलत आहेत.

हे तिघंही नेहमी खरं बोलतात किंवा तिघंही नेहमी खोटं बोलतात, असं गृहित धरलं तर नक्की कोण खोटं बोलत आहे?

उत्तरासाठी इथं क्लिक करा

उत्तर

जस्टिन खरं बोलतो आहे.

जर टॉम जॉ़नविषयी खरं बोलतो आहे, याचा अर्थ असा की, तो जस्टिनला खरं मानतो आहे. म्हणजे टॉम खोटं बोलतो आहे

दुसऱ्या बाजुला ज़ॉन खरा आहे तर जस्टिन टॉमला खरं मानतो आहे, जे चूक आहे हे आपण आधीच सिद्ध केलं आहे.

म्हणजे फक्त जस्टिन खरं बोलतो आहे.

(टुडे प्रोग्रामसाठी हा प्रश्न अलेक्स बेल्लॉस यांनी तयार केली आहे.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)