शेतकऱ्याशीच लग्न करीन, कारण माझे वडील शेतकरीच होते!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

संघर्षकथा : शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली, तरीही ती करणार शेतकरी मुलाशी लग्न!

प्रज्ज्वल पंडित ही बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहांगीर इथं राहते.

प्रज्ज्वल दहावीत शाळेतून दुसरी आली आणि अवघ्या पंधरा दिवसांनी जून 2017 मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून तिच्या वडिलांनी आत्महत्या केली.

त्यामुळं कुटुंबाचा संपूर्ण भार तिच्या आईवर आला आहे. रोजमजुरी करून आई तिला आणि तिच्या दोन भावंडांना शिकवत आहे.

प्रज्ज्वल सध्या गावातील कॉलेजात अकरावीत शिकते. डॉक्टर बनून शेतकऱ्यांची सेवा करण्याचं प्रज्ज्वलचं स्वप्न आहे. पण वडिलांच्या आत्महत्येमुळं ते कसं पूर्ण करणार, हा प्रश्न तिच्यासमोर आहे.

"वडील जिवंत असते, तर मी माझं स्वप्न पूर्ण करू शकले असते," असं प्रज्ज्वल सांगते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)