पाहा व्हीडिओ : अकोल्यातील सांगोळा गावात होते रावणाची पूजा
पाहा व्हीडिओ : अकोल्यातील सांगोळा गावात होते रावणाची पूजा
गावात प्रवेशापाशीच काळ्या पाषाणाची दशमुखी रावणाची मूर्ती आहे. मस्तकांवर मुकुट, हातांमध्ये तलवार आहे. मूर्ती युद्ध पेहरावात आहे. पण ती इथं आली कशी हे कोणालाच माहिती नाही.
रावणाच्या पाषाणमूर्तीची दर शनिवारी पूजा केली जाते. शिवाय विजयादशमीला मोठी पूजा होते. सांगोळा गावाव्यातिरिक्त अमरावती मध्येही रावणाचं विजयादशमीला पूजन करण्यात येतं.
आदिवासींमधील गोंड, कोरकू समाज रावणाला देव मानतात. म्हणूनच आदिवासी गोंड समाजातील लोक या पूजेचं आयोजन करतात.
शहराच्या मध्यभागी राणी दुर्गावती या चौकामध्ये रावण पूजा महोत्सव साजरा केला जातो.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)