एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर अपघात होणार, असा इशारा अनेकांनी दिला होता

mumbai Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन

मुंबईची लाइफलाइन असलेल्या उपनगरीय रेल्वेवर आणखी एक मोठा अपघात झाला आहे. पण या दोन स्थानकांवरच्या या स्थितीबद्दल जागरूक मुंबईकरांनी ट्विटच्या माध्यमातून आधीच लक्ष वेधलं होतं.

काही दिवसांपूर्वीच संतोष आंधळे यांनी याच पुलाचे छायाचित्र ट्विट केलं होतं.

Image copyright Santosh Andhale
प्रतिमा मथळा संतोष यांचं ट्विट

ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं, 'केंद्रीय रेल्वे कृपया यासंदर्भात हालचाल करा. एलफिन्स्टन रोड आणि परळ स्टेशनला जोडणाऱ्या पुलाची ही अवस्था आहे.'

दुर्घटनेनंतर संतोषने तीन दिवसांपूर्वीची आपली पोस्ट शेअर करताना लिहिलं : 'तीन दिवसांपूर्वी मी फेसबुक आणि ट्विटरवर या पुलाबद्दलची स्थिती मांडली होती. माझी भीती खरी ठरली.'

या दोन स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा व्यक्त केली होती.

चंदन केके यांनी जुलै 2016 मध्ये या पुलाच्या फोटोसह ट्विट केलं होतं. तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख करून चंदननं लिहिलं- 'केंद्र सरकार, मध्य रेल्वेवर परळ स्टेशनवर चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का?'. या ट्विटला प्रत्युत्तर देताना मर्फी नावाच्या व्यक्तीने म्हटलं - 'तुमच्या टि्वटकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आणि आज ही दुर्घटना घडली.'

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा चंदन केके यांचं ट्विट

विवेक सिंह म्हणतात- 'स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनंतरही स्थिती बदललेली नाही.'

अरुण यांनी 2015 मध्ये याच पुलाचा फोटो अपलोड केला होता. एलफिन्स्टन रोड स्टेशनवरच्या पुलाची सकाळी सात वाजता अशी स्थिती होती.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अरुण जी यांचं ट्विट

2013मध्ये राजेंद्र आकलेकर यांनीही पुलाबाबत ट्विट केलं होतं- परळ-एलफिन्स्टन यांना जोडणाऱ्या पुलावर प्रवाशांची इतकी गर्दी असते की शॉपिंग मॉलसारखी अवस्था आहे.

या दुर्घटनेनंतर रेल्वेवर टीका करणाऱ्या ट्विटची संख्या वाढली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)