अण्णांचं आंदोलन थांबवण्यासाठी मुख्यमंत्री करणार मध्यस्थी, घेणार अण्णांची भेट

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीला दिली विशेष मुलाखत

अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. नरेंद्र मोदींच्या सरकारने लोकपालच्या नियुक्तीबद्दल गांभीर्य दाखवलं नाही, म्हणून अण्णा दिल्लीत जाऊन आंदोलन करणार आहेत. बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी मोदींवर तोफ डागली.

पण हे आंदोलन होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत. बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी आणि अण्णांमध्ये संवादाचा अभाव असेल, तर तो दूर केला जाईल.

या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी राणेंपासून राज ठाकरेंपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून मुंबई विद्यापीठाच्या निकालांपर्यंत सर्व विषयांवर मतं व्यक्त केली आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)