अण्णा हजारेंबाबत काय बोलले मुख्यमंत्री?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

अण्णा हजारेंच्या आंदोलनाबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री? बीबीसी मराठीला दिली खास मुलाखत

अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. नरेंद्र मोदींच्या सरकारने लोकपालच्या नियुक्तीबद्दल गांभीर्य दाखवलं नाही, म्हणून अण्णा दिल्लीत जाऊन आंदोलन करणार आहेत. बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अण्णांनी मोदींवर तोफ डागली.

पण हे आंदोलन होऊ नये, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत. बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी आणि अण्णांमध्ये संवादाचा अभाव असेल, तर तो दूर केला जाईल.

या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी राणेंपासून राज ठाकरेंपर्यंत आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून मुंबई विद्यापीठाच्या निकालांपर्यंत सर्व विषयांवर मतं व्यक्त केली आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मुलाखतीतले ठळक मुद्दे:

 • नारायण राणेंनी जर तयारी दर्शविली आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मान्य केलं, तर त्यांना नक्कीच एनडीएमध्ये सामाविष्ट करून घेण्यात येईल.
 • एल्फिन्स्टन रोड स्थानकात झालेल्या दुर्दैवी घटनेची जबाबदारी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी स्वीकारली आहे.
 • बुलेट ट्रेनचा फायदा महाराष्ट्रालाही होणार.
 • (राज ठाकरेंचं नाव न घेता) ज्यांचं राजकीय अस्तित्व हरपलं आहे, ते राजकीय अस्तित्व शोधण्यासाठी अशा घोषणा करत आहेत. तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे.
 • बुलेट ट्रेनबाबत बोलण्याआधी त्यांनी अभ्यास या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास करावा.
 • शिवसेना आमच्यासोबत सरकारमध्ये आहे, त्यामुळे आम्ही 'मॅरिड' आहोतच. आमचा घटस्फोट झालेला नाही.
 • (शिवसेनेच्या टीकेबद्दल) प्रत्येकाचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळ असतात.
 • हे सरकार पाच वर्षे चालणार आहे आणि पाच वर्ष माझ्या मुख्यमंत्रिपदाला धोका नाही.
 • सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य हात आहेत. ते कोणाचे आहेत हे योग्य वेळी सांगू.
 • ज्या वेळी या हातांची गरज लागेल ते तेव्हा बाहेर येतील आणि ते तुम्ही विचारही करू शकणार नाही अशा लोकांचे असतील.
 • एनडीएमध्ये सहभागी होण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आम्हांला मिळालेला नाही. त्यांच्या सहभागाची कोणतीही शक्यता सध्या नसली तरी ही शक्यता नाकारताही येत नाही.
 • दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार आहोत. शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करताना अडचणी आल्या ही गोष्ट खरी आहे. अण्णा हजारे
 • अण्णा हजारे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. त्यांच्यात आणि नरेंद्र मोदींमध्ये संवादाचा अभाव असेल, तर तो भरून काढेन. त्यांच्याशी चर्चा करेन.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)