मंदिरांचा जीर्णोद्धार करणारा मुसलमान
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

या मुस्लीम आर्किऑलॉजिस्टने उभारली 200 मंदिरं

मध्य प्रदेशातल्या भग्नावस्थेतल्या मंदिरांचं जीर्णोद्धार करणाऱ्या मुस्लीम पुरातत्त्व शास्त्रज्ञाची बीबीसीचे प्रतिनिधी अनंत प्रकाश आणि सलमान रावी यांनी सांगितलेली विलक्षण कथा.

सन 1992मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आल्यावर भडकलेल्या जातीय दंगलींमुळे हिंदू-मुसलमान यांच्यातली दरी रुंदावली होती.

पण ही गोष्ट आहे ती एका मुसलमान पुरातत्त्व शास्त्रज्ञाची. त्यांनी आठव्या शतकातील प्राचीन हिंदू मंदिरं वाचवण्यासाठी मध्य प्रदेशातील खाण माफियांशी पंगा घेतला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेतली आणि चंबळच्या दरोडेखोरांचंही साहाय्य मागितलं.

आर्कियालॉजीकल सोसायटी ऑफ इंडियामध्ये कार्यरत पुरातत्त्व शास्त्रज्ञ के के मोहम्मद यांनी 2005मध्ये मध्य प्रदेशातल्या मुरैना जिल्ह्यात, बटेश्वर येथील 8व्या शतकातील 200 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)