प्रेस रिव्ह्यू : लास वेगास हल्ल्यानंतर ISच्या दाव्यांवर संशय

लास वेगासमधील हल्ला Image copyright GETTY IMAGES/DAVID BECKER
प्रतिमा मथळा लास वेगासमधील हल्ला

लास वेगासच्या बाबतीत इस्लामिक स्टेटने केलेला दावा कितपत खरा; नेमकी कशी सुरू झाली मुंबईची चेगराचेंगरी; आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आज का आहेत केरळात, या बातम्यांचा आढावा आपण आज घेऊया.

इस्लामिक स्टेटचा दावा खोटा

लास वेगासच्या गोळीबार आपल्या एका "जवाना"ने केल्याचा कथित इस्लामिक स्टेट (IS) दावा फसवा असू शकतो, असा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी दिला आहे.

तज्ज्ञांचं म्हणनं आहे की IS संघटना आता असे खोटे दावे करण्यावर भर देत आहे.

AFP वृत्तसंस्थेच्या हवाल्याने हिंदुस्थान टाईम्सनं दिलेल्या वृतानुसार, "अलिकडच्या काळात इस्लामिक स्टेट संघटनेनं दहशतवाद्यांशी संबंध नसलेल्या विविध हल्ले आणि घटनांविषयी खोटे दावे केले आहे."

अमेरिकेतल्या दहशतवाद प्रतिबंध केंद्राचे पॉल क्रिकशँग यांनी सांगितलं, "स्वत:वर लक्ष आकर्षित करण्यास आतूर IS ला हे माहिती समर्थक हे सरकार किंवा प्रसारमाध्यांवर विश्वास ठेवणार नाही. म्हणून IS या दिवसांमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी काहीही दावे करू शकतं."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
अमेरिकेतल्या लास वेगासमध्ये काँसर्टदरम्यान गोळीबार झाला.

फुलं पडल्यानं उडाला गोंधळ

एल्फिन्स्टन रेल्वे पुल दुर्घटनातून वाचलेल्या शिल्पा विश्वकर्मा (२०) या तरुणीची मुलाखत महाराष्ट्र टाइम्सनं घेतली.

प्रतिमा मथळा एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशन

विश्वकर्मा यांनी सांगितलं की घटनेच्यादिवशी त्या पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होती. आणि त्यातून भारा वाहणाऱ्या एका व्यक्तीकडील फुलं पडली आणि 'फुले पडली, फुले पडली' म्हणता म्हणता त्याचं 'पूल पडला', असा अनेक प्रवाशांचा गैरसमज झाला. त्यातून गोंधळ उडून चेंगराचेंगरीची घटना घडली, असा शिल्पानं सांगितलं आहे.

शॉर्टसर्किट किंवा अन्य कोणतीही अफवा चेंगराचेंगरीकारणीभूत नव्हती, तर पावसामुळे पुलावर प्रचंड गर्दी झाली असताना, क्षमतेपेक्षा जास्त फुलं वाहणाऱ्या व्यक्तीचा तोल गेला आणि ही दुर्घटना झाल्याचं तिने मुलाखतीत सांगितलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आज केरळात

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जन रक्षा यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी केरळात जाणार आहेत.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा योगी आदित्यनाथ

टाईम्स आफ इंडियाच्या वृत्तानुसार केरळातील कन्नूरमध्ये ते यात्रेत सहभागी होतील. पक्षातर्फे या यात्रेसाठी निमंत्रण मिळालेले ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. कन्नूर हा केरळच्या मुख्यमंत्र्यी पिनरयी विजयन यांचा जिल्हा आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)