ब्रेकिंग न्यूज : अरुणाचलमध्ये हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले, 5 जवान ठार

हेलिकॉप्टर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा MI17 V5 हे हेलिकॉप्टर भारतीय हवाई दलाचा कणा समजले जाते.

अरूणाचल प्रदेशातील तवांग परिसरात शुक्रवारी भारतीय हवाईलदलाचे MI17 V5, हे हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली. सकाळी ६ च्या सुमारास हा अपघात घडला.

पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, भारत-चीन सीमेनजीकच्या तवांगमध्ये झालेल्या या दुर्घटनेत हवाईदलाच्या पाच जवानांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.

नियमित दौऱ्यासाठी गेले असताना या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे भारतीय हवाई दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

V5 हे भारतीय हवाईदलातील प्रमुख हेलिकॉप्टरपैकी एक आहे. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्याने लष्करी मोहीम आणि सैन्याच्या सामानाच्या वाहतुकीसाठी केला जातो.

शुक्रवारी सकाळी झालेल्या या अपघाताच्या चौकशीचे आदेश सैन्याकडून देण्यात आले असून नेमक्या कारणांचा शोध सुरू आहे.

बचाव पथक अपघातस्थळी पोहोचले असून जखमी जवानाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

(ही एक ब्रेकिंग न्यूज असून ती सतत अपडेट करण्यात येईल.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)