सोशल : तुम्ही शेवटचं पत्र कधी लिहिलं होतं आठवतं?

शेवटचं पत्र

ईमेल आणि What'sApp च्या जमान्यात आपण पत्र लिहिणं विसरलो आहोत.

जागतिक टपाल दिनाच्या निमित्तानं बीबीसी मराठीनं वाचकांना प्रश्न विचारला होता की शेवटचं पत्र तुम्ही कधी लिहिलं होत. वाचकांनी त्याला प्रतिसाद देत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

पेशानं शिक्षक असलेले बाळूभाऊ खोडके सांगतात की त्यांनी या वर्षीच्या शिक्षक दिनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पत्र लिहिली होती.

Image copyright Balubhau Khodke
प्रतिमा मथळा बाळूभाऊ खोडकेंनी लिहीलेलं पत्र

शौचालय आणि स्वच्छतेची आवश्यकता तसंच महत्त्व कळावं याकरिता हा पत्रलेखन उपक्रम आम्ही राबवला होता असं ते सांगतात.

प्रीती दामलेंनी सांगितलं की त्यांचा आजही टपाल खात्यावर फार विश्वास आहे. "मी आजही माझी महत्वाची कागदपत्रं टपाल खात्याने पाठवण्यास आग्रही असते."

"मी शेवटचं पत्र दहा वर्षापूर्वी लिहीलं होतं. "सज्जद हजवानी म्हणतात. तर प्रचिती तलाठींसाठी पत्र म्हणजे जवळच्या मित्र मैत्रिणींशी गुजगोष्टी करायचं साधन होतं.

Image copyright Facebook

अपूर्व ओक म्हणतात की त्यांनी नुकतीच मराठी शाळांना पत्र लिहिली होती. सुहा भोंडेंनी शेवटचं पत्र 1986 मध्ये लिहिलं होतं.

Image copyright Facebook

"मी शेवटचं पत्र दहावीच्या परीक्षेत लिहीलं होतं," असं सचिन जाधव यांनी सांगितलं आहे. हेमंत बोरकर म्हणतात की त्यांनी शेवटचं पत्र दोन वर्षापुर्वी लिहीलं होतं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics