शाळा फक्त 'ति'च्यासाठी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

वर्धेच्या या गावात ही आहे तनुची एकटीची शाळा

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावात एक विद्यार्थी संख्या असलेली जिल्हा परिषदेची शाळा आहे. गेल्यावर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोन विद्यार्थी होते.

त्यातला एक विद्यार्थी पाचवी पास झाला आणि यंदाच्या शैक्षणिक वर्षांत फक्त तनू मडावी ही एकटीच विद्यार्थिनी शिल्लक राहिली. त्यामुळे आता एकट्या तनूसाठीच आता ही शाळा भरते.

तिच्यासाठीच रोज प्रत्येक विषयाचे तास होतात. या एका विद्यार्थिनीला शिकवण्यासाठी रोज अरूण सातपुते हे शिक्षक शाळेत येतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)