फोटो गॅलरी : रंगारंग मुंबईची ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळातली छायाचित्र

A camel ride on Mumbai's Marine Drive in 1977 Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा मरीन ड्राइव्ह - उंटावरून सैर, 1977

'मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका..' असं एका लावणीत पठ्ठे बापूरावांनी मायानगरी मुंबईचं वर्णन केलं आहे. या नगरीने प्रत्येकावर भुरळ घातली आहे. कोणी यातून वाचलं असेल, अशी व्यक्ती सापडणं विरळा.

ज्येष्ठ छायाचित्रकार, निर्मात्या, पटकथाकार सूनी तारापूरवाला यांनी 1977 पासून मुंबईची निरनिराळी रूपं टिपली आहेत.

'मिसिसिपी मसाला', 'द नेमसेक' आणि 'ऑस्कर' नामांकनप्राप्त 'सलाम बॉम्बे' सारख्या सिनेमांचं लिखाण त्यांनी केलं. तसंच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'लिटल झिजू'चं दिग्दर्शनही त्यांचंच होतं.

सूनी तारापूरवाला यांनी टिपलेल्या या फोटोंमधून मुंबईच्या दैनंदिन जीवनाचं दर्शन तर होतच, शिवाय देशातल्या एका वैविध्यपूर्ण शहराच्या सामाजिक स्थानाचं महत्त्वही .

मुंबईबद्दल असलेल्या आपुलकीतून त्यांनी हे फोटो काढलेले आहेत.

सूनी तारापूरवाला यांनी काढलेल्या या फोटोंचं प्रदर्शन "होम इन द सीटी" या शीर्षकाने 13 ऑक्टोबरपासून शेमोल्ड प्रेस्कॉट रोड या गॅलरीत होणार आहे.

Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा लिलिपूट आणि स्टेलन स्कार्सगार्ड 1987मध्ये सिनेमाच्या सेटवर.
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा खोट्या बंदुकीचा खेळ, 1985
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा सिनेगॉग, 2012
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा मरीन ड्राईव्हला झालेल्या एअर शोसाठी जमलेले प्रेक्षक, 2005
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा विमानाची राखण, जुहू विमानतळ, 1982
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा 'द परफेक्ट मर्डर' या सिनेमाच्या सेटवर, 1987
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा 'सलाम बॉम्बे' या सिनेमासाठी झालेल्या कार्यशाळेत अभिनेता सर्फू आणि इरफान खान (उजवीकडील), 1987
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या घरी, 2005. 2011मध्ये त्यांचं निधन झालं.
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा मुंबईची खासियत...चौपाटी
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा गणेश विसर्जनाचा माहोल, 2016
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा नासिरूद्दीन शहा आणि स्टेलन स्कार्सगार्ड सिनेमाच्या सेटवर, 1987
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी इंदिरा गांधी यांचे पोस्टर, 1985
Image copyright Sooni Taraporevala
प्रतिमा मथळा 'जांबाझ'च्या प्रिमियरच्या वेळी नौदलाच्या बॅण्डचं सादरीकरण, 1986
Image copyright Sooni Taraporewala
प्रतिमा मथळा 'जांबाझ'च्या प्रीमियरला राज कपूरची एंट्री, 1986

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)