दार्जिलिंगचा संप 'चहाच्या' मुळावर?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

दार्जिलिंग : स्वतंत्र गोरखालँडसाठी कामागारांच्या संपानंतर 'चहा' महागणार?

स्वतंत्र गोरखालँड राज्याच्या आंदोलनामुळे तीन महिने दार्जिलिंगमधल्या बँका, शाळा, दुकानं बंद होती. या आंदोलनाचा सामान्य जनजीवनावर परिणाम झाला.

आंदोलनकर्ते हे गोरखा समाजाचे होते. याच समाजातील बरेच दार्जिलिंगमधल्या चहाच्या मळ्यांमध्ये काम करतात. हे कामगार आंदोलनात सहभागी झाल्यानं इथल्या चहाच्या उत्पादनवर परिणाम झाला आहे.

यंदा इथे चहाचं उत्पादन ३० टक्के कमी झाल्याने चहाच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बीबीसी प्रतिनिधी समीर हाशमी आणि प्रोड्यूसर सुरंजना तिवारी यांचा स्पेशल रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)