'सुट्टीला नाही न म्हणणारा, मोठी पगारवाढ देणारा बॉस आदर्श'

आदर्श बॉस Image copyright Getty Images

आज जागतिक बॉस दिवस आहे. त्या निमित्ताने बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना प्रश्न विचारला होता की तुमच्या मते आदर्श बॉस कसा असावा. झालेल्या चर्चेचा हा गोषवारा.

रामेश्वर खरड पाटील यांनी आदर्श बॉसची व्याख्या एकदम सोपी करून टाकली आहे. ते म्हणतात -- "सुट्टी मागितल्यावर नाही म्हणू नये, परफॉर्मन्स अप्रेझल करताना मित्रासारखं सांभाळून घ्यावं."

Image copyright Facebook

मयूर दीक्षित म्हणतात की सगळ्यांत जास्त "increment" अर्थात पगारवाढ देणारा बॉस आदर्श आहे. बाकी सगळ झूठ आहे.

"बॉस मित्रासारखा असावा आणि त्याने इतर कर्मचाऱ्यांना पण ज्ञान द्यावे," असं प्रविण भगत यांनी लिहीलं आहे.

सचिन कडू म्हणतात की बॉस स्वतः टेन्शन न घेणारा आणि दुसऱ्याला टेन्शन देणारा असावा.

Image copyright Facebook

अमोल सपकाळे म्हणतात की बॉस चांगला टीम लीडर असावा. 'चांगला' आणि 'बॉस' या दोन गोष्टी अस्तित्वात असूच शकत नाहीत असं रोहित खाडिलकर म्हणतात. संदीप गुलाखेंना वाटतं की आदर्श बॉसने कामाचं क्रेडिट द्यायला हवं.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)