असा सावरला त्यांनी आपला संसार
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

विशाखा धर्मपाल डबले - नागपूरच्या महिला हमाल कशा खेचत आहेत संसाराचं गाडं

विशाखा धर्मपाल डबले या नागपूर रेल्वेस्थानकावर एक महिला हमाल आहेत. साधारणत: पुरुषांचंच मानल्या जाणाऱ्या या व्यवसायात विशाखा कशा आल्या? आणि का?

पतीच्या अकाली निधनानंतर त्यांना कुणाचाही आधार नव्हता. मग जीवाचं रान करत त्यांनी रेल्वेस्थानकावर हमाली करायला सुरुवात केली.

उघड्यावर आलेल्या आपल्या कुटुंबाला अतिशय कष्टानं सावरलं, आणि मुलांना चांगलं शिक्षण द्यायला कष्ट करतच आहेत.

संकट आल्यावर खचून न जाता हिमतीनं लढा, असा सल्ला त्या इतर महिलांना देतात. त्यांची ही प्रेरणादायी कथा.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)