भिकेच्या पैशांतून उभी राहिली शाळा!
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

प्रश्नचिन्ह : अमरावतीमध्ये गरजूंसाठी भिकेच्या पैशांतून उभी केली शाळा

मुळात जगण्याचाच प्रश्न ज्या समाजापुढे आहे, त्यांच्यासाठी आहे ही शाळा - 'प्रश्नचिन्ह'. मुलांच्या शिक्षणासाठी मतीन भोसले यांनी हातात भिक्षापात्र सुद्धा घेतलं.

एकेक रुपयाची भीक मागायला सुरुवात केली. मुलांना सोबतीला घेऊन त्यांनी भीक मागितली.

लहान मुलांना भीक मागण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली मतीन यांची रवानगी तुरुंगात झाली. पण मतीन खचले नाहीत. सुटका झाल्यावर पुन्हा कामाला लागले.

या शाळेसाठी मतीन यांच्या काकांनी त्यांना शेतीलगतची जमीन देणगीदाखल दिली. समाजातून मदतीचे हात पुढे आले.

मैत्र मांदियाळी या संस्थेनं इमारती बांधून दिल्या. दात्यांचा ओघ वाढला. शैक्षणिक साहित्य, धान्य, चक्की, शाळेचा सदरा आदी वस्तू दानात मिळू लागल्या.

सध्या 20 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेमध्ये अल्पशा मानधनावर शाळेत कामावर आहेत.

(अमरावतीहून नितेश राऊत यांचा बीबीसी मराठीसाठी रिपोर्ट)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)