भारतात ट्रान्सजेंडर समाजाविषयी जागृती करण्यासाठी चॅनल

भारतात ट्रान्सजेंडर समाजाविषयी जागृती करण्यासाठी चॅनल

या उपक्रमामुळे ट्रान्सजेंडर समाजाला प्रतिष्ठा मिळेल, अशी रचना मुद्राबोईना यांना अपेक्षा आहे.

चुकीची माहिती असल्यानं गैरसमज होतात. ट्रान्सजेंडरना मारहाण होते. त्यामुळे जागृती करण्याची गरज असल्याचं रचना यांना वाटलं. त्यातून 'ट्रान्सव्हिजन' हे यू ट्यूब चॅनल सुरू झालं.

रचना आणि सहकारी, स्वयंसेवक आणि देणगीदारांच्या मदतीनं व्हीडिओ तयार करतात. त्यांना चित्रपट निर्माते मोझेस तसंच पवना ही कार्यकर्ती यू ट्यूब चॅनलसाठी मदत करतात.

प्रत्येक एपिसोडला 12 ते 13 हजार रूपये खर्च येतो. त्यांनी आजवर खिशातून खर्च केला.

आता क्राऊडसोर्सिंगमधून तीन आठवड्यात आम्ही साडेचार लाख रूपये जमवले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)