सोशल : 'कायद्याचा धाक हवा, शिक्षेचा नको'

फाशी Image copyright Thinkstock
प्रतिमा मथळा मी फाशीविरोधात आहे असं विधान माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केलं आहे.

"सरकारनं सांगितलं म्हणून आपण दयेचे अर्ज रद्द केले, नाहीतर मी फाशीविरोधातच," असं विधान माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर बीबीसी मराठीनं 'होऊ द्या चर्चा'मध्ये वाचकांच्या प्रतिक्रिया मागितल्या होत्या. गंभीर गुन्ह्यांना फाशीची शिक्षा देणं योग्य आहे असं मत बहुसंख्य वाचकांनी मांडलं आहे.

तर काही वाचक फाशीची शिक्षा नको या मताचे देखील आहेत.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा महिला मंडळ फोंडाघाटनं दिलेली प्रतिक्रिया

फाशीची शिक्षा असावी असं महिला मंडळ फोंडाघाटनं म्हटलं आहे. पीडितांना सहन करव्या लागणाऱ्य़ा मरण यातनांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

मयूर सानेर हे देखील फाशीची शिक्षा असावी या मताचे आहेत. ते म्हणतात, "एखाद्या आरोपीनं गैरकृत्य केलं असेल तर त्याला फाशी व्हायलाच हवी. आपल्या देशामध्ये सहजासहजी फाशी होत नाही."

तर तुषार राऊत म्हणतात, कायद्याचा धाक हवा शिक्षेचा नको. त्यासाठी गुन्हा सिद्ध होण्याच्या प्रमाणात वाढ झाली पाहिजे.

"सध्या भारतात सुरू असलेली पद्धत मला योग्य वाटते. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात फाशी योग्य इतर मोठ्या गुन्ह्यात जन्मठेप," असं ते म्हणतात.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा तुषार राऊत यांची प्रतिक्रिया

संजय सादळगेकर हे फाशीच्या विरोधात आहेत. फाशीची शिक्षा ही कायद्याची तत्वाशी विसंगत आहे असं ते म्हणतात.

विजया पाटील म्हणतात गुन्हेगाराची मानसिक स्थिती पण लक्षात घ्यावी. त्यांना फाशीची शिक्षा नसावी असं वाटतं.

Image copyright facebook
प्रतिमा मथळा विजया पाटील यांची प्रतिक्रिया

जयप्रकाश संचेती यांनी सरकारचा सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक नसतो असं म्हंटलं आहे. तसंच त्यांनी तोट्यातील सौद्यासाठी अतिरेक्यांना जिवंत ठेवायचं का? असा सवाल उपस्थित केला आहे.

तर गणेश ताम्हणकर यांना फाशीच्याा शिक्षेमुळे गुन्हे वाढतील असं वाटतं. रणजित तावरे यांनी मात्र फाशी पेक्षा क्रूर शिक्षा असावी असं म्हंटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)