सोशल : 'गुजरातमध्ये भाजपचे बुरूज ढासाळतील, किल्ला पडणार नाही'

अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अल्पेश ठाकोर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी

गुजरात निवडणुकांची अजून घोषणा झाली नसली तरी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. राज्यातील दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि ओबीसी नेते अल्पेश ठाकोर हे भाजपाविरूद्ध उभे ठाकले आहेत.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना विचारलं होतं की हार्दिक, अल्पेश आणि मेवाणी हे तरुण त्रिकूट मोदींना जड जाईल का? वाचकांनी भरभरून प्रतिक्रिया पाठवल्या आहेत. त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया.

विवेक दिवे म्हणतात की हे तिघं एकत्र लढले तरच ते मोदींवर भारी पडू शकतात. राजेश लोके मात्र म्हणतात की काही फरक पडणार नाही. गुजरातमध्ये मोदींनी काम केलं आहे.

Image copyright Facebook

प्रदीप रोकडे म्हणतात की, "म्हणून तर भाजपाचे सर्व मुख्यमंत्री गुजराती मध्ये प्रचार करत आहे. त्यांना ही निवडणूक जड काय महागच जाणार आहे. आणि भाजपाचा परतीचा प्रवास इथून चालू होईल."

"गुजरात मॉडेलचा भंपकपणा याच युवकांनी देशासमोर आणला. कोणतेही पाठबळ नसताना तिघांचंही नेतृत्व स्वतंत्रपणे परंतु एकाच ध्येयाने वाटचाल करत आहेत. दिवसेंदिवस तिघे अधिक प्रगल्भ होत आहेत," असं मत संतोष लोळगे यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

सत्य शर्मा म्हणतात की जिग्नेश मेवाणी, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर, हे भाजपविरूद्ध उभे ठाकले असले तरी त्याने मोदींना काहीच फरक पडणार नाही.

"गुजरात मध्ये भाजपचे बुरूज ढासाळतील, किल्ला पडणार नाही," असं देव पाटील म्हणतात. तर दिलीप बेंग म्हणतात की "हे तरुण जातीपातीचं राजकारण करत आहेत, यांना विकास नको आहे."

Image copyright Facebook

"जातीपातीचं राजकारण नको. काँग्रेसनेही धर्म किंवा जातपात मध्ये न आणता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकावी," असं ब्रिजेश जोशी यांनी म्हटलं आहे.

Image copyright Facebook

"घोडों की रेस में गधो का क्या काम?" असं विनायक पाटील यांनी म्हटलं आहे.

तर विरू वाणी म्हणतात, "जनतेलाच विकास नको आहे. मतदानाच्या वेळेस पाचशे रुपये मिळाले तरी बस."

Image copyright Facebook

किशोर अदसाद म्हणतात की एकीकडे मदमस्त सत्ता आणि एकीकडे हे त्रिकुट, असा सामना आहे. तरी फारसा फरक पडणार नाही.

प्रियांका सुतार म्हणतात की दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवाणी, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर यांच्यामुळे गुजरात निवडणुकीवर नक्कीच फरक पडेल.

याच विषयावर आम्ही बीबीसी न्यूज गुजरातीचे संपादक अंकुर जैन यांच्याशी फेसबुक लाईव्ह वर केलेली चर्चा बघा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)