एक्सक्लुझिव्ह मुंबई विद्यापीठीच्या ऑनलाईन गोंधळाला कुलगुरू जबाबदार - मुख्यमंत्री
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

एक्सक्लुझिव्ह : मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन गोंधळाला कुलगुरू जबाबदार - मुख्यमंत्री

मुंबई विद्यापीठातल्या ऑनलाईन पेपर तपासणीत उडालेल्या घोळानंतर कुलगुरू संजय देशमुख यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. या घोळाला संजय देशमुखच जबाबदार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं.

"ज्यांनी ऑनलाईन पद्धतीला मान्यता दिली ते कुलगुरू आणि त्यांची समिती जबाबदार आहे." विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडेंची नाही का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की "विद्यापीठातले निर्णय मंत्र्यापर्यंत येत नाहीत. मंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही."

"ऑनलाईन पद्धत लागू करण्यापूर्वी ही पद्धत तपासायला पाहिजे होती. एकदम सगळ्यांना नवी पद्धत लागू करणं अयोग्य होतं. त्यात अनेक त्रुटी होत्या. त्या दूर केल्या नाहीत," असं सांगतानाच मुख्यमंत्री म्हणाले, "ऑनलाईन पद्धत ही अत्यंत चांगली पद्धत आहे आणि ती यापुढे बंद होणार नाही."

शूटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

आणखी वाचा:

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)