भुयारी मेट्रोसाठी खोदकाम होतं तरी कसं?
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

मुंबई मेट्रोसाठी आले TBM: भुयारी मेट्रोचं खोदकाम होतं तरी कसं?

मुंबईच्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो प्रकल्पासाठी 17 TBM (टनेल बोरिंग मशीन) येणार आहेत.

पहिल्या मशीननं धारावीतील नयानगर येथील लाँचिंग शाफ्टमधून प्रत्यक्ष भुयारी मार्गाच्या खोदकामास सुरुवात केली आहे.

सं काम करतंTBM?

110 मीटर लांबीचं हे मशीन भागा-भागांमध्ये चीनहून समुद्रमार्गे भारतात आलं. सुमारे 17 ट्रेलरच्या मदतीने ते बांधकाम स्थळी आणलं गेलं.

प्रत्यक्ष बांधकामस्थळी ते ठेवणं हे आणखी आव्हानात्मक काम आहे.

क्रेन किंवा लाँचरच्या मदतीनं मशीनचे भाग जमिनीत उतरवण्यात येतात. त्यासाठी आधी मोठ्या विहिरीसारखा खड्डा खणावा लागतो, ज्याला लॉचिंग शाफ्ट म्हणतात.

जवळजवळ 50 मीटर व्यासाच्या या लॉचिंग शाफ्टमध्ये मशीन उतरवलं जातं. हे मशीन शाफ्टमध्ये पुढे सरकवण्यासाठी रूळ तयार केलेले असतात. त्या रूळांवर मशीनचा एकेक भाग उतरवला जातो.

महत्त्वाचे तीन भाग - कटर हेड, फ्रंट शील्ड, मधली शील्ड. त्याच्या मागच्या बाजूला पूर्ण लाँचर असतो.

या सगळ्या मशीनची जुळवाजुळवी करण्यासाठीच 40 ते 45 दिवस लागतात.

हे मशीन एका टप्प्यात जमिनीखाली सोडता येत नाही. कारण मशीन 110 मीटरचे आणि लॉचिंग शाफ्ट 50 मीटरचा आहे. आणि 110 मीटर रुंदीचा लॉचिंग शाफ्ट तयार करणं जागेअभावी शक्य नसतं.

त्यामुळे या मशीनचे वेगवेगळे भाग खाली उतरवून त्यांची जोडणी तिथंच होते.

शूटींग - राहुल रणसुभे

ग्राफिक् - मुंबई मेट्रो रेल महामंडळ

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)