प्रेस रिव्ह्यू : राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यास सक्षम : संजय राऊत

राहुल गांधी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात भारताचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

द एशियन एजमधील वृत्तानुसार, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात भारताचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

गांधी यांच्या लोकप्रियतेत भर देखील पडत आहे, असंही मत राऊत यांनी मांडलं. याच बरोबरीने, मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील भाजप राहुल गांधी यांना घाबरला असल्याचं वक्तव्य केलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुका आणि भाजपला असलेला विरोध या मुद्द्यावर राऊत व ठाकरे यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केल्याचं मत या वृत्तात द एशियन एजनं मांडलं आहे.

द एशियन एजमधील वृत्तानुसार, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यात भारताचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी केलं आहे.

गांधी यांच्या लोकप्रियतेत भर देखील पडत आहे. असंही मत राऊत यांनी मांडलं. याचबरोबरीने, मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील भाजप राहुल गांधी यांना घाबरला असल्याचं वक्तव्य केलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणूका आणि भाजपला असलेला विरोध या मुद्द्यावर राऊत व ठाकरे यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केल्याचं मत या वृत्तात द एशियन एजनं मांडलं आहे.

व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या व्हीडिओंचा माग काढण्याचे आदेश

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा सुप्रिम कोर्टानं व्हॉट्सअप मेसेंजर अॅपला व्हायरल होणाऱ्या बलात्काराच्या व्हीडिओंबाबत तक्रार करण्याची व्यवस्था सुधारण्यास सांगितले आहे.

हिंदुस्तान टाइम्समधील वृत्तानुसार, सुप्रिम कोर्टानं व्हॉट्सअप मेसेंजर अॅपला व्हायरल होणाऱ्या बलात्काराच्या व्हीडिओंबाबत तक्रार करण्याची व्यवस्था सुधारण्यास सांगितलं आहे.

कोर्टानं लहान मुलांच्या लैंगिक संबंधांचे चित्रीकरण करणारे व्हीडिओ, बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचे व्हीडिओ यांबाबत माहिती गोळा करण्यासाठी एक स्वतंत्र विभाग स्थापन करावा, असे आदेश सरकारला दिले आहेत.

तसंच, असे व्हीडिओ मुख्यत्वे व्हॉट्सअपवरुन व्हायरल होत असल्यानं व्हॉट्सअपनं हे व्हीडिओ कुणाकडून आले आणि कुणी व्हायरल केले याबाबतची सुविधा अद्यावयत करावी.

जेणेकरुन त्याबाबत तक्रार करण्याची प्रक्रिया सुकर होऊ शकेल, असं कोर्टानं व्हॉट्सअपला सुचवलं आहे.

पक्षाघाताच्या उपचारासाठी 'तिनं' केला 467 किलोमीटरचा प्रवास

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये राहणाऱ्या 8 वर्षांच्या रविता वळवी या पॅरालिसिस झालेल्या मुलीला उपचारांसाठी तब्बल 467 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे. (संग्रहित छायाचित्र)

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, महाराष्ट्रातील नंदुरबारमध्ये राहणाऱ्या 8 वर्षांच्या रविता वळवी या पॅरालिसिस झालेल्या मुलीला उपचारांसाठी तब्बल 467 किलोमीटरचा प्रवास करावा लागला आहे.

उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या रविताला एमआरआय चाचणी करण्यासाठी हा प्रवास करावा लागला. मणक्याच्या दुखापतीनंतर रविताला पक्षाघाताचा झटका आला होता.

यावरील उपचारासाठी करावी लागणारी एमआरआय चाचणीची सुविधा उपलब्ध नसल्यानं तिला मुंबई गाठावी लागली.

ग्रामीण भागात आरोग्याशी निगडीत सोयीसुविधा नसल्यानं शहरातील हॉस्पीटलमधील गर्दी वाढत असल्याचं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाहीच

Image copyright PAL PILLAI / GETTY IMAGES
प्रतिमा मथळा शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र त्यांनी आदेश देऊनही कर्जमाफीचे घोंगडे भिजतच पडले आहे.

दैनिक दिव्य मराठी मधील वृत्तानुसार, शेतकऱ्यांच्या खात्यात गुरुवारपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

मात्र त्यांनी आदेश देऊनही कर्जमाफीचे घोंगडं भिजतच पडलं आहे. तांत्रिक कारणांमुळे प्रत्यक्ष कर्जमाफीला उशीर होत असून संपूर्ण कर्जमाफी कधी होईल? या प्रश्नाचं उत्तर देण्यास सहकार विभागातील अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.

गुरुवार रात्रीपासून टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल, असा दावा केला जात असून १५ नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असेही आश्वासन दिले गेले आहे.

लोकसत्ता मधील याच विषयाशी निगडीत वृत्तामध्ये सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची बाजू देखील मांडण्यात आली आहे.

बँकांनी पाठविलेल्या माहितीमध्ये अनेक तांत्रिक चुका असल्या तरी त्या दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या दूर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात येईल.

असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबई पुण्यात परराज्यातल्या लोंढ्यांचं प्रमाण वाढलं

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परराज्यातील लोंढ्यांचं प्रमाण वाढलं आहे.

एबीपी माझामधील वृत्तानुसार, महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये परराज्यातील लोंढ्यांचं प्रमाण वाढलं आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं जगभरातील शहरांत वाढणाऱ्या लोंढ्यांबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

जगातील वेगाने वाढणाऱ्या 100 शहरांमध्ये प्रचंड स्थलांतर होत असून, या यादीत तब्बल 25 शहरं भारतातील आहेत.

महत्त्वाचं म्हणजे खचाखच भरलेल्या शहरांच्या यादीत, पहिल्या दहा शहरांमध्ये मुंबई, दिल्ली आणि कोलकाताचा समावेश आहे.

तर आशिया खंडात पुणे आणि सुरत ही दोन शहरं स्थलांतरबाधित असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.

सर्वाधिक स्थलांतर करणारं राज्य म्हणून बिहार पहिल्या क्रमांकावर आहे. असं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालातून समोर आलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)