सोशल : 'मुंबईत छठपूजेच्या नावाखाली परप्रांतीयांचे शक्तिप्रदर्शन'

छटपूजा Image copyright Getty Images

मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक शहरात छठपूजा हा बिहारी सण उत्साहात साजरा करण्यात आला.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारलं होतं की छठपूजा आता मुंबईच्या संस्कृतीचा घटक झाली आहे का? वाचकांनी यावर भरभरून प्रतिक्रिया पाठवल्या आहेत आणि त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया.

शैलेश गोसावी म्हणतात की, छठपूजा संस्कृतीचा भाग नाही, तर शक्तिप्रदर्शनाचं साधन झालं आहे.

विनायक बनसोडे म्हणतात की, या सणाचा फक्त राजकीय व्यासपीठ म्हणून वापर केला जातो.

"राजकीय आखाडा न करता जर सण साजरे झाले तर काही आक्षेप नाही," असं मत प्रिया सामंत यांनी मांडलं आहे.

Image copyright Facebook

अमेय जोशी म्हणतात की, "सकाळ झाली की बॅग घेऊन लोकल पकडून कामाला जायचं आणि संध्याकाळी तुडुंब भरलेल्या लोकलने घरी येऊन झोपायचं, ही मुंबईची संस्कृती आहे. बाकी छठपूजा वगैरे सगळं मिथ्या आहे."

हितेन पवार म्हणतात की मुंबईच्या उरावर लोंढे आणून बसवल्याने असं झालेलं आहे.

Image copyright Facebook

मराठी नेत्यांचं मतांचं राजकारण याला जबाबदार आहे, असं मत संजय थिटे यांनी मांडलं आहे.

सचिन कर्डक म्हणतात की प्रत्येकाला सण साजरा करायचा हक्क आहे. पण त्याने वादळ नाही निर्माण झालं पाहिजे.

छटपूजा आता मुंबईचा सण झाला आहे, आणि ते मराठी माणसाला भारी पडणार, असं म्हणणं आहे ज्योतिबा कातकर यांचं.

Image copyright Facebook

अंकुश देवकरांना मात्र छठपूजा मुंबईच्या संस्कृतीचा भाग झाली आहे, असं वाटतं.

राजेश लोके म्हणतात की छटपूजा मुंबईच्या संस्कृतीचा भाग झाली आहे. आणि याला कारण मराठी माणूस आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)