मानव विरुद्ध मगर : निसर्गरम्य ओडिशातला आगळा संघर्ष

ओडिशाच्या केंद्रापाडा जिल्ह्यातील भीतरकनिका हे अभयारण्य मगरींसाठी राखीव आहे. मगरींसाठी राखीव ठेवण्यात आलेलं हे जगातलं सर्वांत मोठं क्षेत्र आहे.

90च्या दशकात हा प्रकल्प सुरू झाला तेव्हा इथं 74 मगरी होत्या.

गेल्या काही वर्षांत मगरींच्या प्रजननाचं प्रमाण वाढलं. त्यामुळं या मगरी आता खाऱ्या पाण्यातून गोड्या पाण्यात येत आहेत. नदी आणि तळ्यांमध्ये या मगरी येऊन गावकऱ्यांवर हल्ले करतात.

रिपोर्टर - सलमान रावी, बीबीसी

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)