मुंबई विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा संताप : 'नापास' निकालानं वर्ष वाया गेलं

यंदापासून मुंबई विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे पेपर ऑनलाईन तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र यात मोठा घोळ झाल्याने विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागू शकले नाहीत. 4-5 महिन्यांनी निकाल लागले आणि त्यातही बहुतांश विद्यार्थी नापास झाले.

त्यांनी पेपर पुर्नतपासणीला टाकले पण निकाल अद्यापही लागलेले नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं एक शैक्षणिक वर्ष वाया गेलं. अनेकांची उच्च शिक्षणाची संधीही वाया गेली.

या प्रक्रियेचा फटका बसलेल्या काही विद्यार्थ्यांशी बीबीसी मराठीने साधलेला संवाद.

बीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे यांचा रिपोर्ट

शूटींग आणि एडीटींग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)