पंजाबच्या एका गावाचा निर्धार : पीक काढल्यानंतर चारा जाळणार नाही

पंजाबच्या एका गावाचा निर्धार : पीक काढल्यानंतर चारा जाळणार नाही

शेतकरी चारा जाळतात हे दिल्लीच्या प्रदूषणामागचं मोठं कारण समजलं जातं. त्यावरून दरवर्षी पंजाबचे शेतकरी, शहरी नागरिक, पर्यावरणतज्ज्ञ आणि सरकार या सगळ्या पातळ्यांवर चर्चा होते.

पीक काढल्यानंतरचा चारा जाळल्याने मोठं प्रदूषण होतं, पण त्यावर इलाज काय? यावर पंजाबमधल्या कलरमाजरा गावातल्या शेतकऱ्यांनी उपाय शोधला आहे.

असं असलं तरी एवढ्या मोठ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणं, हे आव्हानच आहे.

(बीबीसी पंजाबीच्या सरबजीत धालिवाल आणि गुलशन कुमार यांचा रिपोर्ट.)

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)