पाहा व्हीडिओ : समाजानं वाळीत टाकलेल्या कुटुंबीयांचा संघर्ष

गेल्या तीन महिन्यांत राज्यभरात, जात पंचायतींविरोधात १० गुन्हे दाखल झाले आहेत.

पण या कायद्याचा अधिक प्रचार, कडक अंमलबजावणी आणि हा अजामीनपात्र गुन्हा करून दरारा निर्माण करण्याची मागणी या प्रथांविरोधात लढणा-या पीडित आणि कार्यकर्त्यांची आहे.

उमेश आणि मंजू रूद्राप यांचा २७ वर्षांचा संसार सहजीवन म्हणून आनंदाचा होता, पण सामाजिक जीवन म्हणून अत्यंत वेदनादायी होता.

एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आंतरजातीय विवाह केला. घरी सगळ्यांनी ते मान्य केलं पण ज्या तेलुगू मडेलवार परीट समाजातून रूद्राप कुटुंबीय येतात, त्या समाजाच्या जात पंचायतीला मात्र ते पटलं नाही.

रिपोर्टर: मयुरेश कोण्णूर

शुटिंग आणि एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)