सुमारे दीड वर्षं बंद असलेली माथेरानची रेल्वे पुन्हा सुरू

सुमारे दीड वर्षं बंद असलेली माथेरानची रेल्वे पुन्हा सुरू

110 वर्षं जुनी ही ट्रेन म्हणजे माथेरानची ओळख आहे. नेरळ ते माथेरान धावणारी ही ट्रेन पर्यटकांचं नेहमीच आकर्षण ठरली आहे.

पण ही गाडी रुळावरून घसरल्यानं सुमारे दीड वर्षं बंद होती. त्यामुळे माथेरानमधील पर्यटन व्यवसाय निम्म्यावर आला होता.

पण आता या ट्रेनच्या इंजिनीतून पुन्हा धूर निघायला लागला आहे. सध्या अमन लॉज ते माथेरान याच टप्प्यात ही ट्रेन पर्यटकांच्या सेवेत आहे.

बीबीसी मराठी प्रतिनिधी राहूल रणसुभे यांचा रिपोर्ट आणि शूटिंग

एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)