सोशल : 'तुम्ही नोटा बदला, आम्ही सरकार बदलतो'

नोटाबंदीचं 1 वर्षं Image copyright AFP
प्रतिमा मथळा नोटाबंदीचं 1 वर्षं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निश्चलनीकरणाची घोषणा करून आज एक वर्ष झालं. भाजप सरकारच्या या निर्णयाबद्दल त्याही वेळी उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

आता वर्षभरानंतर सरकार हा दिवस 'काळं-धन विरोधी दिन' म्हणून साजरा करत आहे. तर विरोधी पक्षांनी या दिवसाचं वर्णन 'काळा दिवस' असं केलं आहे.

आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारलं की "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा नोटाबंदी करण्याबद्दल तुमचा सल्ला मागितला, तर काय म्हणाल?"

त्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली.

अंजली ढेंबरे म्हणतात, "तुम्ही नोटा बदला, आम्ही सरकार बदलतो."

Image copyright FACEBOOK

या मतांमध्ये अनेक परस्परविरोधी मतंही मांडली गेली.

नोटाबंदीच्या निर्णयाचं समर्थन करताना भाग्यश्री पाटोले जगताप म्हणतात, "काही मंडळी हे फक्त नकारात्मकच घडलं आहे, असं म्हणतात. पण हे पूर्णत: चुकीचं असून काही सकारात्मक परिणामही भारतीय अर्थव्यवस्थेवर घडले आहेत, याचाही विचार होणं गरजेचं आहे."

Image copyright FACEBOOK

संदीप गुलाखे यांनीही सरकारच्या या निर्णयाचं समर्थन करताना म्हटलं आहे की, "पुढे जात राहा. तुमचा हेतू चुकीचा नव्हता. मोदीजी, आम्ही तुमच्याबरोबर आहोत आणि यापुढेही तुमच्या बरोबरच राहू."

Image copyright FACEBOOK

निशांत पोतदार यांना मात्र ही भूमिका अजिबातच मान्य नाही. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना ते म्हणतात, "नोटबंदी हा मुर्खपणा होता. नवीन 2000च्या नोटा मिळवण्यासाठी सर्वसामान्य माणूस ATMच्या लाईनीत उभा होता. एकही पुढारी, नेता किंवा सरकारी अधिकारी दिसला नाही, असं का?"

Image copyright FACEBOOK

संकेत राजेभोसले यांनी पंतप्रधानांना "नवीन कोणताही निर्णय फक्त स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी" घेऊ नका, असा शहाजोगपणाचा सल्ला दिला आहे.

Image copyright FACEBOOK

तसंच जयसिंग पारकर म्हणतात, "ब्लॅक मनीवाले बोंबाबोंब करणारच."

Image copyright FACEBOOK

तुकाराम माने यांनी सावध प्रतिक्रिया देत म्हटलं आहे, "अजून दोन वर्षं काहीच बोलणार नाही."

हितेन पवार यांनी पंतप्रधानांच्या 'मन की बात' वर हल्ला चढवत, "कान बंद करून स्वत:ची 'मन की बात' ठोसवणाऱ्या माणसाकडून सल्ला मागितला जाऊ शकत नाही," असं म्हटलं आहे.

रवि गाडे म्हणतात, "म्हणायचं काय, डायरेक्ट 2019 ला घरी बसवायचं." 2019 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

दिनेश गाढवे पाटील यांनी 'नोटाबंदी : कुणाची चांदी, कुणाची नाकेबंदी?' या शीर्षकाखाली आपली विस्तृत प्रतिक्रिया देत सरकारच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे.

Image copyright FACEBOOK

अशोक देविदास काकडे आणि शेखर पाटील यांनी काहीशा हलक्याफुलक्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अशोक काकडे म्हणतात, "होऊन जाऊ द्या परत एकदा" आणि शेखर पाटील यांनी "आज टीव्हीच बघणार नाही," असं म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)