पाहा फोटो : कोण आहे 2017 मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर?

2000 मध्ये प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड बनली होती. त्यानंतर 17 वर्षांनी हा मुकुट भारताकडे परतला आहे.

फोटो कॅप्शन,

हरियाणाच्या मानुषी छिल्लरने चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचं मुकुट मिळवलं आहे. भारतासाठी हा क्षण तब्बल 17 वर्षांनंतर आला आहे. 2000 मध्ये प्रियंका चोप्राला हा बहुमान मिळाला होता.

फोटो कॅप्शन,

20 वर्षांची मानुषी तिघा भावंडांमध्ये मधली आहे. ती MBBSच्या दुसऱ्या वर्षाला शिकते आहे.

फोटो कॅप्शन,

चीनमध्ये शनिवारी रात्री झालेल्या या स्पर्धेची उपविजेती ठरली इंग्लंडची स्टेफनी हिल.

फोटो कॅप्शन,

1996 मध्ये मिस वर्ल्ड किताबावर नाव कोरणारी रिटा फारिया पहिली भारतीय ठरली होती. त्यानंतर 1994 मध्ये ऐश्वर्या राय, 1997 साली डायना हेडन आणि 2000मध्ये प्रियंका चोप्राला हा किताब मिळाला होता.

फोटो कॅप्शन,

तिच्या यशानं भारावून गेलेले तिचे आजोबा चंद्र सिंह शेरावत यांनी बीबीसीला सांगितलं, "लहानपणापासूनच मानुषी प्रत्येक काम मन लावून करते. चीनला जाताना तिने मला म्हटलं होतं की ती जिंकूनच येणार. मिस वर्ल्ड बनूनच येणार."

फोटो कॅप्शन,

मानुषीला हृदयविकारतज्ज्ञ व्हायचं आहे. तिला ग्रामीण भागात रुग्णालयं काढायची आहेत, असं तिच्याबद्दल मिस वर्ल्ड स्पर्धेच्या वेबसाईटवर लिहिलं आहे.

फोटो कॅप्शन,

मानुषी ही शास्त्रीय नृत्यकलेत पारंगत आहे.

फोटो कॅप्शन,

'मिस इंडिया'चा मान मिळवल्यानंतर तिनं मिस वर्ल्डची तयारी सुरू केली. यासाठी ती चीनमध्ये 25 दिवसांसाठी गेली होती.

फोटो कॅप्शन,

व्यायाम आणि स्पोर्ट्सची आवड असणारी मानुषी मूळ हरियाणाची आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या फारच कमी असण्यासाठी हे राज्य चर्चेत असतं. 2016च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत पदक पटकावणारी कुस्तीपटू साक्षी मलिकही हरियाणाचीच आहे.

फोटो कॅप्शन,

"हरियाणातल्या मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. तिच्या या यशाबद्दल आम्ही आनंदी आहोत. तिचा आम्हाला अभिमान आहे," असं तिच्या आजोबांनी सांगितलं.

फोटो कॅप्शन,

मिस वर्ल्डच्या अंतिम फेरीत मानुषीला विचारण्यात आलं होतं "तुझ्यामते सर्वाधिक पगार कोणत्या नोकरीसाठी असायला हवा?". तेव्हा ती म्हणाली, "सर्वांत जास्त सन्मान आईचा व्हायला हवा. त्याचं मोल पैशात करता येणार नाही. पण आई होणं हे कठीण काम आहे." तिच्या या उत्तरानं उपस्थितांची मनं जिंकली.