इंदिरा गांधी फोटोबायोग्राफी : इंदिरा गांधींची झलक, काही दुर्मीळ फोटोंमधून

शंभर वर्षांपूर्वी, आजच्याच दिवशी - 19 नोव्हेंबरला अलाहाबाद इथं आनंद भवनमध्ये पंडित जवाहरलाल आणि कमला नेहरू यांच्या मुलीचा जन्म झाला.

इंदिरा प्रियदर्शिनी म्हणजेच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या फोटो आठवणी. त्यांची ही एका अर्थानं फोटोबायोग्राफीच!

Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा आज, शंभर वर्षांपूर्वी, 19 नोव्हेंबर 1917 ला अलाहाबाद इथं आनंद भवनमध्ये मुलीचा जन्म झाला. त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं इंदिरा प्रियदर्शिनी.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा मुलीचा जन्म झाल्यानं नेहरू कुटुंबातील काही सदस्य नाराज होते. पण जवाहरलाल नेहरू अतिशय आनंदात होते.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत इंदिरा.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा इंदिरा यांचा फिरोज गांधी यांच्याशी 26 मार्च 1942 ला अलाहाबादमध्ये विवाह झाला.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा लग्नानंतर दोघेही काश्मीरला फिरायला गेले. काश्मीर हे नेहरू- गांधी कुटुंबाचं आवडतं ठिकाण.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा इंदिरा गांधी 1959-60 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी 18 मार्च 1971 ला इंदिरा गांधींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा फॅमिली फोटो : संजय, राजीव, मेनका, सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधी यांच्यासह इंदिरा.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासह आजीच्या भूमिकेत इंदिरा गांधी.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा जानेवारी 1969 - लंडनमध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्यासमवेत.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा जुलै 1972 मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती ज़ुल्फिकार-अली-भुट्टो यांच्याबरोबर सिमल्यामध्ये. इथेच त्या महत्त्वाच्या सिमला करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा एका प्रसन्न क्षणी... उत्तर भारतातील तीज सण सामान्य महिलांसमवेत साजरा करताना इंदिरा गांधी.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा हीच ती जागा! कार्यालयातून 1, सफदरजंग रोड या निवासस्थानाकडे निघालेल्या इंदिरा गांधी. 31 ऑक्टोबर 1984ला दोन अंगरक्षकांनी इथेच त्यांची हत्या केली.
Image copyright INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE
प्रतिमा मथळा तीन मूर्ती भवनमध्ये इंदिरा गांधी यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.
Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा तीन नोव्हेंबर 1984 ला इंदिरा गांधींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याशिवाय, हेही वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)