सुधाकर गाडे यांनी मांडली शेतकऱ्यांची व्यथा
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

'सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्या कर्जमाफीचा काहीही फायदा नाही' - सुधाकर गाडे

महाराष्ट्र सरकारनं अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती, मात्र वास्तवात अनेकांना हा लाभ मिळूच शकला नाही.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजही शेती किंवा कौटुंबिक गरजांसाठी खासगी सावकारांकडून कर्ज घ्यावं लागतं. आणि काही शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतल्यानं ते कर्जमाफीपासून वंचित राहतात.

आणि मग ते वंचित शेतकरी परत सावकारी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकण्याची भीती आहे.

या सावकारी कर्जाच्या परतफेडीच्या चक्राबाबत न्यायालयीन लढाई लढणारे एक शेतकरी सुधाकर गाडे यांची ही कथा.

वाचा पूर्ण बातमी इथं - बँकवाल्यांचं कर्ज माफ झालं, सावकाराकडून घेतलेल्यांचं काय?

रिर्पोटर- मयुरेश कोण्णूर, शूट आणि एडिटींग- शरद बढे, निर्मिती- जान्हवी मुळे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)