पाकिस्तानमधल्या धाकड बहिणी
मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे

पाहा व्हीडिओ : पाकिस्तानमधल्या 'धाकड' बहिणी

अबरिन आणि हुमेरा आशिक यांची कहाणी आपल्याकडच्या दंगल सिनेमासारखी आहे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे त्या मार्शल आर्ट्स शिकल्या.

ज्युदो, जि-जित्सू आणि बेल्ट रेसलिंगमधली राष्ट्रीय स्तरावरील सगळी मेडल त्यांनी जिंकली आहेत.

आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मेडल जिंकायची आहेत. मुली मुलांपेक्षा कमी नाहीत, हेच यांना जगाला सांगायचं आहे.

मेडलमधून मिळालेल्या पैशातून त्यांनी वडिलांचं हक्काच्या घराचं स्वप्नही साकार केलं आहे.

हम किसीसे कम नही असं त्या अभिमानाने म्हणतात.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)