मुंबईकरांनो, ओखी चक्रीवादळ येतंय, या 18 गोष्टींची तयारी करा

मुंबई पाऊस Image copyright PUNIT PARANJPE/AFP/Getty Images

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ओखी या चक्रीवादळातमुळे मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. अशा चक्रीवादळच्या परिस्थितीमध्ये काय काळीज घेतली पाहिजे, याची माहिती हवामान विभागानं प्रसिद्ध केली आहे. ही दक्षता नक्कीच तुम्हाला उपयुक्त ठरेल.

हे करा

1. घराची काळजी घ्या. घरातील फरश्या, खिडक्या, दरवाजे खराब स्थितीत असतील तर त्यांची तातडीने दुरुस्ती करून घ्या.

2. घराच्या आजूबाजूच्या स्थितीची पाहणी करा. मृत आणि उन्मळत आलेली झाडं काढून टाका.

3. घरात लाकडी फळ्या ठेवा. त्याचा उपयोग काचेच्या खिडक्यांना लावण्यासाठी आधार म्हणून करता येईल. जर घरात लाकडी फळ्या नसतील तर खिडक्यांच्या काचांना कागद चिटकवून ठेवा, जेणे करून काच जरी फुटले तरी काचेचे तुकडे पसरणार नाहीत.

4. रॉकेलचा कंदील तयार ठेवा. याशिवाय टॉर्च आणि जास्तीचे बॅटरी सेल असतील याची दक्षता घ्या.

5. धोकादायक इमारतींपासून सतर्क राहा.

6. घरात रेडिओ असेल तर तो सतत सुरू राहील याची दक्षता घ्या. रेडिओवर हवमानाची स्थिती आणि इतर सूचना प्रसारित केल्या जातात. ते काळजीपूर्वक ऐका आणि इतरांनाही त्याची माहिती द्या. इतरांना फक्त अधिकृत माहितीच द्या.

Image copyright PUNIT PARANJPE/AFP/Getty Images

7. सखल भागातल्या समुद्र किनाऱ्यांपासून दूर राहा. उंच ठिकाणी वेळेत पोहोचा.

8. जर तुमचं घर उंचावर असेल तर तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला सुरक्षित जागी जाण्यास सांगितलं तर सूचनांचे पालन करा.

9. जास्त पावसात ज्या ठिकाणी नद्यांना पूर येतो तिथून दूर राहा.

10. कोरडे खाद्यपदार्थ स्वतःजवळ जास्त प्रमाणात ठेवा. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता ठेवा.

11. जर तुमचं घर असुरक्षित ठिकाणी असेल तर नुकसानीचं प्रमाण कमी करण्यासाठी मौल्यवान आणि इतर वस्तू वरच्या मजल्यावर ठेवा.

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पूर परिस्थिती, वादळांपासून बचाव कसा कराल?

12. रॉकेलचे डबे, शेती अवजारं, बागकामातील अवजारं, फलक अशा वस्तू वादळात धोकादायक ठरतात. वादळात अशा वस्तू तुमच्यावर आदळू शकतात. अशा वस्तू हटवून योग्य ठिकाणी झाकून ठेवा.

13. मुलांची आणि वृद्धांची काळजी घ्या.

14. वादळाचा डोळा जर तुमच्या परिसरावर असेल तर यावेळी पाऊस आणि वाऱ्यापासून दिलासा मिळतो. यावेळात अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ काही दुरुस्तीची कामं करू शकता. पण यावेळी सुरक्षित राहण्याची काळजी घ्या. कारण विरुद्ध दिशेनं अधिक वेगानं वारा येऊ शकतो.

Image copyright PUNIT PARANJPE/AFP/Getty Images

15. शांत राहा. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये लढण्याची तुमची क्षमता इतरांनाही मार्गदर्शक ठरेल.

16. समाजविघातक घटकांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून प्रवृत्त करा. त्यांची माहिती पोलिसांना द्या.

17. वाहन चालवताना काळजी घ्या.

18. झालेल्या नुकसानाची माहिती प्रशासनाला द्या. आपत्तिग्रस्त परिसरातील लोकांच्या सुरक्षेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना कळवा.

हे करू नका

1. अफवांवर विश्वास ठेऊ नका.

2. जोपर्यंत आपत्ती व्यवस्थापनातील कर्मचारी सांगत नाहीत, तोपर्यंत सुरक्षित निवारा सोडू नका.

3. वादळ शांत असल्याच्या काळात सुद्धा सुरक्षित निवारा सोडू नका. यावेळी किरकोळ दुरुस्तीची कामं करू शकता.

4. रस्त्यावरील विजेच्या खांबांना लटकणाऱ्या वायर, तारा यांना स्पर्श करू नका.

हे वाचलं का?

हे पाहिलं का?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाकिस्तान : प्राचीन हिंदू मंदिराचा तलाव पडला कोरडा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)