सोशल - बाबरी आणि राममंदिर हे विषय राजकारण्यांना जास्त जवळचे

साधू Image copyright Getty Images

बाबरी मशीद पाडल्याच्या 25 वर्षांनंतर 'आजही बाबरी आणि अयोध्या हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो का?' हा प्रश्न बीबीसी मराठीनं वाचकांना विचारला होता. त्यावर वाचकांच्या भरभरून प्रतिक्रिया आल्या.

काही जणांना आजही हा विषय महत्त्वाचा वाटत असला तरी बहुतांश जणांचं मत मात्र 'इतरही महत्त्वाचे विषय आहेत देशात, त्याकडे आधी लक्ष दिलं पाहिजे' अशा प्रकारचं आहे.

उमेश इत्रज म्हणतात की, "हा विषय खरंतर सर्वसामान्यांपेक्षा राजकारण्यांच्या जास्त जवळचा आहे. निवडणूक आली की, राजकारणी सोयीस्कररित्या हा विषय उकरून काढतात. म्हणूनच याविषयी कधी कुठला निर्णय होईल असं मला वाटतं नाही. कारण यावर निर्णय झाला तर मग राजकारणी कशावर मतं मागणार?"

Image copyright Facebook

"बाबरी आणि अयोध्येचा मुद्दा कधीच महत्त्वाचा नव्हता. कालही नव्हता, आजही नव्हता आणि उद्याही नसेल. देशातील अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींवरून लक्ष विचलीत करण्यासाठी असे मुद्दे वापरले जातात," असं मत मांडलं आहे विक्रांत कदम यांनी.

Image copyright Facebook

राकेश म्हात्रेंनी ट्वीट करून "हा मुद्दा अजिबात महत्त्वाचा नाही. अयोध्या आणि बाबरीमुळे निदान महाराष्ट्रातल्या लोकांना काहीच फरक पडत नाही," असं म्हंटलं आहे.

मिर्झा अब्दुल नदवी लिहितात की, "देशाचा विकास ना मंदिर बांधल्याने होईल ना मशिद. देशाचा विकास होईल तो फक्त अखंड एकता आणि बंधुत्वामुळेच."

Image copyright Facebook

"राममंदिर उभं राहावं असं कुणालाच वाटत नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती नाही. कारण एकदा का मंदिर झालं की, हिंदूंना संघटित करणं कठीण होईल," असं मत व्यक्त केलं आहे माऊली रूद्रे यांनी.

Image copyright Facebook

"बाबरी मशीद पाडल्यानंतर भारतात दोन्ही समाजात असुरक्षितता वाढीस लागली. दंगली झाल्या आणि वातावरण अशांत झालं. हे वातावरण भारतासारख्या विकसनशील देशाला परवडणार नाही आहे," अशोक वालकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Image copyright Facebook

अर्थात सगळ्यांनाच बाबरी-अयोध्या मुद्दा महत्त्वाचा नाही असं वाटत नाही. ओंकार देशपांडे लिहीतात की, हा धार्मिक भावनांचा प्रश्न आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहेच.

Image copyright Facebook

"त्या जागेवर मंदिर होते आणि मंदिरच राहणार," असं आदित्य मेहेंदळे म्हणतात.

Image copyright Facebook

तर "राम मंदिर ही भारताची संस्कृती आहे," असं राम सातपुते यांना वाटतं.

हे पाहिलं का ?

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाकिस्तान : प्राचीन हिंदू मंदिराचा तलाव पडला कोरडा

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)