सोशल : 'मणिशंकरांच्या वक्तव्याने गुजराती अस्मिता दुखावली गेली आहे'

'मणिशंकर अय्यर Image copyright Getty Images

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेपासून पक्षानं स्वत:ला दूर सारलं आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

"पंतप्रधान मोदी हे फारच नीच आहेत. ते सुसंस्कृत नाहीत. ते घाणरेडं राजकारण करत आहेत," असं वक्तव्य अय्यर यांनी केलं होतं.

"माझी मातृभाषा हिंदी नसल्यामुळे माझ्याकडून बोलताना चूक झाली," अशी सारवासारव मणिशंकर अय्यर यांनी नंतर केली.

"मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींची माफी मागावी," असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. "

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकांना विचारलं होतं की :

अनेक वाचकांनी त्यांची मतं व्यक्त केली. त्यातलीच ही काही निवडक मतं.

विशाल शितोळे लिहितात की याचा गुजरात निवडणुकीवर अजिबात फरक पडणार नाही. कारण तिथल्या लोकांना याची गेल्या 22 वर्षापासून सवय आहे.

Image copyright Facebook

"प्रसिद्धी मिळवण्यासाठी याचा मुद्दाम वापर केला जाईल," असं परितोष शेळके यांचं मत आहे.

Image copyright Facebook

काँग्रेसच्या मतांमध्ये थोडी फार तरी घसरण होईल, असं सायली कदम यांना वाटतं.

Image copyright Facebook

संदीप राठी म्हणतात की, "मणिशंकर अय्यर भाजपाला मदतच करत आहेत. जणू काही ते भाजपचे मुख्य प्रचारक आहेत."

Image copyright Facebook

"मणिशंकर अय्यर यांच्या पंतप्रधानांबाबतच्या बेताल बरळण्यानं गुजराती अस्मिता दुखावली गेली आहे. त्यामुळे निवडणुकीत संपूर्ण गुजराती समाज भाजपा सोबत भक्कमपणे उभा राहण्याची शक्यता आहे," असं अजय चौहान यांना वाटतं.

Image copyright Facebook

महेश गाहेवार म्हणतात, "याचा गुजरात निवडणुकीवर परिणाम होईल असं मला वाटतं नाही. काँग्रेसने, खासकरून राहुल गांधींनी हे प्रकरण व्यवस्थित हाताळलं आहे. त्यांनी चांगल्याप्रकारे डॅमेज कंट्रोल केलं आहे."

Image copyright Facebook

भगवान सोनवणे-पाटील लिहितात, "मणिशंकरांच्या वक्तव्याचा आणि गुजरात निवडणुकीचा काहीही संबंध नाही. त्यांना जे बोलायचं, त्यांचं बोलून झालं. भाजपने स्वतः 'नीच' या शब्दाच्या पुढे 'जात' वगैरे शब्द जोडले."

Image copyright Facebook

मिलींद उत्पात यांना वाटतं की या प्रकरणामुळे भाजपच्या जागा वाढतील.

Image copyright Facebook

"मणिशंकर अय्यरांनी जो शब्द वापरला आहे, त्यामुळे काँग्रेसचा वाईट काळ सुरू होईल, असे संकेत आहेत," असं दिनेश शर्मा यांनी लिहिलं आहे.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)