आपला सर्वांत जुना आदिम पूर्वज सापडला

आपला सर्वांत जुना आदिम पूर्वज सापडला

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग इथं मनुष्याच्या पूर्वजाचा सर्वांत जुना सांगाडा शोधण्यात संशोधकांना यश आलं आहे.

याच उत्खनन आणि या जीवाश्माचं जतन, मांडणी करण्यासाठी संशोधकांना तब्बल 20 वर्षं लागली आहेत. हा सांगडा 36 लाख वर्षं जुना आहे, असं संशोधक सांगतात.

हा सांगाडा मुलीचा असावा असं शास्त्रज्ञांना वाटतं. तिच्या पायाची हाडं खूप बारिक असल्यानं या सांगाड्याला लिटिल फूट असं नाव देण्यात आलं आहे.

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)