गुजरात : या टॉप 9 नेत्यांचं काय झालं?

चुरशीच्या निवडणुकीत गुजरात अखेर भारतीय जनता पक्षानं राखलं. सातत्यानं सहाव्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला.

या निवडणुकीत सतत चर्चेत राहिलेल्या या टॉप 9 नेत्यांचं काय झालं?

1. विजय रुपाणी

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गेलं वर्षभर गुजरातची धुरा सांभाळली. पण ऐनवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच राज्यभर फिरून प्रचारदौरे केले.

Image copyright vijay rupani/facebook

राजकोट पश्चिम मतदारसंघातून विजय रुपाणी उभे होते. त्यांनी काँग्रेसच्या इंद्रनील राजगुरू यांचा 53,755 मतांनी पराभव केला.

2. नितीन पटेल

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्र्यांनीही आपला गड राखण्यात यश मिळवलं आहे.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा नितीन पटेल

मेहसाणा मतदारसंघातून निवडणूक लढणारे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी काँग्रेसच्या जीवाभाई पटेल यांचा 7,951 मतांनी पराभव केला.

3. अर्जुन मोढवाडिया

गुजरात काँग्रेसचे एकेकाळी प्रमुख राहिलेले अर्जुन मोढवाडिया यांनाही या निवडणुकांमध्ये पराभवाला तोंड द्यावं लागलं.

Image copyright Twitter
प्रतिमा मथळा अर्जुन मोढवाडिया

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मोढवाडिया यांचा पोरबंदरमध्ये भाजपच्या बाबूभाई बोखिरिया यांनी 1,955 मतांनी पराभव केला.

4. शक्तीसिंह गोहिल

मांडवीमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांच्यावर भाजपच्या वीरेंद्रसिंह जडेजा यांनी 9046 मतांनी मात केली.

Image copyright Facebook
प्रतिमा मथळा शक्तीसिंह गोहिल

गोहिल हे 2012 साली विधानसभेची निवडणूक हरले होते, पण 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणूक ते जिंकले होते.

5. जिग्नेश मेवाणी

गेल्या वर्षभरात गुजरातमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणानं दलित हक्कांचा मुद्दा गाजत होताच. ऐन निवडणुकांमध्येही त्यावरून राजकीय हालचाली झाल्या. त्यामध्ये जिग्नेश मेवाणींचं नाव आघाडीवर होतं.

पहिल्यांदाच या तरुण नेतृत्वानं मोठमोठ्या नेत्यांना आव्हान दिलं होतं.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा जिग्नेश मेवाणी

लोकप्रिय दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी अपक्ष म्हणून उमेदवार लढवली, पण त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. वडगाममधून रणांगणात उतरणाऱ्या मेवाणी यांनी भाजपच्या विजयकुमार चक्रवर्ती यांचा 19,696 मतांनी पराभव केला.

6. अल्पेश ठाकोर

आणखी एक तरुण नेते ज्यांनी या निवडणुकीत काँग्रेसला साथ देऊन त्यांचं पारडं थोडं जड केलं, ते होते अल्पेश ठाकोर.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अल्पेश ठाकोर

काँग्रेसमध्ये सामील झाल्यावर राधनपूरचं तिकीट मिळवणारे अल्पेश ठाकोर यांनी भाजपच्या लवीनजी सोलंकी यांच्यावर 14,857 मतांनी विजय मिळवला.

7. सौरभ पटेल

बोटाड मतदारसंघातून भाजपचं तिकीट मिळवणाऱ्या भाजपच्या सौरभ पटेल यांनी काँग्रेसच्या धीरजलाल कालढिया यांचा 1,221 मतांनी पराभव केला.

8. चंदनजी ठाकोर

सिधपूरमध्ये काँग्रेसचे चंदनजी ठाकोर यांनी भाजपचे जयनारायण व्यास यांचा 17,260 मतांनी पराभव केला.

9. कांदळ जाडेजा

कुटियानातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कांदळ जाडेजा यांनी लखनभाई ओडिद्रा यांच्यावर 23709 मतांनी विजय मिळवला.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)