पाहा व्हीडिओ: आदिवासींच्या शिकारीमुळे अनाथ झालेले जंगली प्राणी 'आमटे आर्क'मध्ये दाखल झाल्यावर काय घडलं?

पाहा व्हीडिओ: आदिवासींच्या शिकारीमुळे अनाथ झालेले जंगली प्राणी 'आमटे आर्क'मध्ये दाखल झाल्यावर काय घडलं?

ज्येष्ठ समाजसेवी बाबा आमटेंच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या हेमलकसा येथील कामाचा 40 वर्षांनंतर आता वटवृक्ष झाला आहे. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदा आमटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गडचिरोलीच्या दुर्गम जंगलात 1972 साली आदिवासींच्या आरोग्यासाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू हे काम विस्तारत गेलं. आरोग्यासोबतच शिक्षण, आदिवासींची उपजिविका आणि वन्यजीव संरक्षण यामध्ये गेली चार दशकं अविरत काम सुरु आहे. आमटेंनी प्राण्यांसोबतच्या नात्याला वेगळा आयाम दिला आहे.

'आमटे अॅनिमल आर्क'ची रेस्क्यू सेंटर म्हणून असलेली मान्यता 3 नोव्हेंबर 2017 मध्ये संपली आहे.

स्क्यू सेंटरच्या परवान्याच्या नूतनीकरणाची शासकीय प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. पण सेंट्रल झू ऑथोरिटीने प्राण्यांचं रेस्क्यू सेंटर चालवण्यासंबंधी काही आक्षेप नोंदवले आहेत. त्यानुसार आमटे यांनी मास्टरप्लॅन सरकारकडे संमतीसाठी दिला आहे. पण सेंट्रल झू ऑथोरिटीचा मुख्य आक्षेप आहे तो जंगली प्राण्यांना हाताळण्याविषयी.

रेस्क्यू सेंटरमधील जंगली प्राण्यांना हाताळण्यावर कायद्यानुसार काही बंधनं आहेत. त्याविषयी नोटीस मिळाल्याने आमटे आणि प्राणी यांच्यातील नात्यावर बंधन येऊ शकतं. अधिक वाचा प्राजक्ता धुळप यांचा स्पेशल रिपोर्ट.

शूट आणि एडिट - आरजू आलम

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)