सोशल : 'धोतर आणि साडी आधारला लिंक करायला सांगाल'

सुब्रह्मण्यम स्वामी Image copyright Getty Images

'पाश्चिमात्य कपडे हे विदेशी गुलामगिरीचं प्रतिक आहे. भाजपनं मंत्र्यांच्या पोशाखाविषयी नियमावली तयार करावी', असं ट्विट भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केलं आहे.

त्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं त्यांच्या वाचकांना याबाबत काय वाटतं असं विचारलं होतं.

विशाल विशाल लिहितात, "कोणी कुठले कपडे घालायचे, कुठलं अन्न खायचं, कुठली भाषा बोलायची, कुठल्या भागात राहून व्यवसाय करायचा हे ठरविण्याचा अधिकार यांना कोण देतंय? आपण व्यक्तिस्वातंत्र्याकडे जातोय की हुकुमशाहीकडे?"

Image copyright Facebook

असंच काहीसं मत शुभम धाने यांचं आहे. त्यांनी सविस्तर कमेंट लिहून त्याचं मत मांडलं आहे. "भारतात असा कोणता नेता आहे जो राजकीय जीवनात पाश्चिमात्य (जीन्स किंवा तत्सम) कपडे परिधान करून वावरतो?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Image copyright Facebook

संदेश हिवले लिहितात, "पाश्चिमात्यांचे कपडे वापरण्याला तुम्ही जर गुलामगिरी प्रमाणे मानत असाल तर पाश्चिमात्यांचे तंत्रज्ञान, पाश्चिमात्यांसोबत राजकीय संबंध, अनेक करारही तोडा की मग."

Image copyright Facebook

"उद्या धोतर आणि साडी आधारला लिंक करा असंही म्हणाल," असा टोमणा आदिती शिंदे यांनी मारला आहे.

Image copyright Facebook

"जर पाश्चिमात्य लोक तुमच्या देशात येऊन साडी, झब्बा लेंगा घालू शकत असतील, तर त्यांच्या देशातल्या संस्कृतीप्रमाणे आपण अंग झाकू शकेल असा पेहराव करण्यात काय अडचण आहे. तसं असेल तर स्वामींनी आपली कार, आपला मोबाईल, आपलं रेझर, शेविंग क्रीम सगळंच बदलावं," असं मयूरेश प्रभू म्हणतात.

Image copyright Facebook

नचिकेत भंडारींना मात्र हे मत पटलेलं नाही. ते लिहितात, "भारतामध्ये असे कपडे वापरायला हवेत की, जे आपल्या वातावरणाला अनुकूल असतील. इंग्रज काळा कोट वापरतात कारण त्यांच्याकडे थंडी असते. आपण कोट घालतो आणि परत एसी लावतो. त्यात वीज वाया घालवतो. आपण सुती, खादीचे कपडे वापरायला हवेत."

Image copyright Facebook

सुहास भोंडेंना देखील स्वामी यांचं मत शतशः पटलेलं आहे. ते म्हणतात, "जर अरबी लोक त्यांचे स्थानिक कपडे सगळीकडे घालतात. तर आपण का नाही?"

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)