सोशल : 'शेतकऱ्यांचा संप ही 2017मधली महत्त्वपूर्ण घटना'

Mumbai footover bridge Image copyright Dhananjay Sahani

चालू वर्षाचा हा शेवटचा आठवडा. अवघ्या काही तासांमध्ये नवीन वर्षाला म्हणजे 2018ला सुरुवात होणार आहे.

पण सरत्या म्हणजेच 2017 या वर्षी अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या. बीबीसी मराठीनं वाचकांना त्याबद्दल प्रश्न विचारला होता.

या वर्षातली सर्वांत महत्त्वाची घटना कोणती, असं तुम्हाला वाटतं? असं आम्ही वाचकांना विचारलं होतं.

यावर उत्तर देताना बीबीसी मराठीच्या वाचकांनी अनेक महत्त्वपूर्ण घटनांना उजाळा दिला. त्यातल्या काही निवडक घटना;

अजय चौहान यांनी फेसबुकवरील प्रतिक्रयेत उत्तर प्रदेशमधला भाजपचा प्रचंड बहुमतानं झालेला विजय या वर्षातली मोठी घटना असल्याचं सांगितलं आहे.

Image copyright FACEBOOK

तर राहुल गिरी यांनी म्हटलं आहे की, गुजरातमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांच्या प्रतिष्ठेचा आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीचा विजय झाला आहे.

तर यंदाच्या वर्षात जिग्नेशमुळे एक नवीन चेहरा समोर आला, असं विवेक दिवे यांनी लिहिलं आहे.

शेतकऱ्यांची ऐतिहासिक कर्जमाफी ही गोष्ट 2017 मधली महत्त्वपूर्ण घटना होती, असं अनिल कुलकर्णी यांनी लिहिलं आहे.

Image copyright FACEBOOK

शेतीप्रधान भारत देशात शेतकरी संपावर जातात आणि देशाचं सरकार शब्दाला न जागता त्यांच्या तोंडाला पाने पुसतं. तेव्हा शेतकऱ्यांचा संप ही मोठी घटना आहे, असं मनोज उंडे यांनी लिहिलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जेरुसलेमला इस्रायलची राजधानी घोषित केलं, ही सरत्या वर्षातली महत्त्वपूर्ण घटना आहे, असं मत पारस प्रभात यांनी मांडलं आहे.

Image copyright FACEBOOK

अनुप मुळे यांना जीएसटीची अंमलबजावणी आणि तीन तलाक बंदीसाठी सरकारनं उचलेली पावलं मोठी घटना वाटते.

Image copyright FACEBOOK

यासोबतच बाहूबली या चित्रपटानं कमावलेला गल्ला, मीराबाईनं वेटलिफ्टिंगमध्ये मिळवलेलं सुवर्ण पदक, एलफिन्स्टन ब्रीज आणि कमला मिल दुर्घटना या 2017सालच्या महत्त्वपूर्ण घटना आहेत, असं विशाल सवने यांना वाटतं.

भूषण गवळी यांनी मात्र आपण आता बीबीसी मालवणीची वाट पाहत आहोत, असं फेसबुकवरच्या प्रतिक्रियेत लिहिलं आहे.

Image copyright FACEBOOK

तर प्रकाश मालशे यांना नोटबंदी आणि आधार कार्डची सर्व गोष्टींसोबत जोडणी घटना महत्त्वपूर्ण वाटते.

प्रशांत वाघमारे यांना मुंबईचा पाऊस ही घटना तर शैलेश काळे यांना एलफिन्स्टन ब्रीजवरची चेंगराचेंगरीची घटना महत्त्वपूर्ण असल्याचं वाटतं.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)