सोशल - 'देवाला पण भोंग्यांचा रागच येत असेल, श्रद्धेची जाहीरातबाजी कशाला?'

लाऊडस्पीकर Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी काढलेल्या नव्या आदेशानुसार यापुढे कोणत्याही धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना भोंग्यांवर (लाऊडस्पीकर) बंदी घातली आहे.

धर्मिक स्थळांवर अनधिकृतपणे लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर टाच आणण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे. उत्तर प्रदेश सरकारने बुधवारी काढलेल्या नव्या आदेशानुसार यापुढे कोणत्याही धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना भोंग्यांवर (लाऊडस्पीकर) बंदी घातली आहे. जर भोंगे बसवायचे असतील तर त्यासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

सरकारने या विषयी अधिकृत घोषणा देखील केली असून सरकारी आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा देखील इशारा उत्तर प्रदेश सरकारने दिला आहे.

"कोणत्याही धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही कारणासाठी लाऊडस्पीकर किंवा भोंगे लावायचे असतील तर त्यासाठी अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच धार्मिक स्थळांवर हे भोंगे लावता येणार आहे."

हा नवा कायदा लागू होईपर्यंत सर्व धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले अनधिकृत भोंगे आणि लाऊडस्पीकर तातडीने हटवण्यात यावे, असे आदेश देखील देण्यात आलेले आहे.

दरम्यान, बीबीसी मराठीनं याच विषयावर सोशल मीडियावर वाचकांना आपलं मत विचारलं होतं.

त्यावर "मंदिर असो या मस्जिद, भोंग्याची काही गरज नाही," असं मत जवळपास सर्वच वाचकांनी व्यक्त केलं आहे.

"धार्मिक आणि सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर नसावेत. कारण दोन-चार लोकांमुळे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होतो. पण धार्मिक गोष्ट असल्याने लोक काही बोलत नाही. पण अशा गोष्टींवर आवाज उठवला पाहिजे," असं मत रवींद्र धात्रक यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

मयूर बेर्डे लिहितात, "...तर धर्म ही प्रत्येकाची खाजगी बाब आहे. प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. मात्र गाजावाजा करून मी कसा धर्मनिष्ठ आहे, हे जगाला दाखवण्याची काहीच गरज नाही."

तसंच, "प्रार्थना ही मनापासून करावी आणि मनातल्या मनात करावी. त्याचा इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी," असा सल्ला ही त्यांनी दिला आहे.

रामेश्वर पाटील यांनी या मुद्द्याला पकडून राजकारण्यांवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, "मंदिर असो वा मशीद, भोंगे कुठेच नसावे. पण राजकारण्यांना सत्ता एवढी प्रिय आहे की ते कधीच धर्मांधाच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाहीत, ही खरी समस्या आहे."

Image copyright Facebook

"मशिदींवर भोंगे इस्लामी शरीयाप्रमाणे नाहीत. कुणीतरी कुणाची तरी पाहिलेली सोय आहे ती. त्यावर इतकं चर्वण कशाला? कुठल्याही इस्लामी देशात मी तरी भोंगे पाहिले नाहीत," असं मत सुयोग कुडतरकर यांनी व्यक्त केलं आहे.

Image copyright Facebook

"अजिबात नाही, पूर्णपणे बंदी असावी. देवाला पण भोंग्यांचा रागच येत असेल. श्रद्धेची जाहिरातबाजी कशाला करावी," असं अनूप मुळे यांनी म्हटलं आहे.

"एखादा सण असेल, त्यावेळी स्पीकर लावले तर समजून घेऊ. मग तो सण कुणाचाही असू देत, पण रोज भोंगे लावून आपल्या धर्माचं प्रकटीकरण करण्यात काहीच अर्थ नाही," अंस निलेश झोरे यांना वाचतं.

Image copyright Facebook

"भोंगे लावून देव प्राप्त होणार आहे का? त्यापेक्षा चांगले कर्म करा, देव कुठेही प्राप्त होईल," असा सल्ला संदीप पाटील यांनी दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

महत्त्वाच्या बातम्या

संत तुकारामांचा खून झाला होता की ते सदेह वैकुंठाला गेले?

व्हायरल न्यूड सीनमुळे मराठी अभिनेत्रीला 'पॉर्नस्टार' म्हणून हिणवलं जातंय

धुळे हत्याकांडाची पुनरावृत्ती : 'रक्तबंबाळ झालेले ते तरुण गयावया करत होते'

साडे 7 अब्ज रुपये खर्चून बनवलेला सिनेमा चीनमध्ये आपटला; सिनेविश्व हादरलं

ट्रंप म्हणतात, मी चुकून चुकीचं बोललो : अमेरिकन निवडणुकीत रशियाचा हस्तक्षेप

पाकिस्तान : निवडणुकीच्या रिंगणात पुरुषांसमोर उभी ठाकलेली हिंदू महिला

संभाजी भिडेंच्या दाव्याप्रमाणे आंबेडकरांनी मनुस्मृतीची स्तुती केली होती का?

मुंबईची टायटॅनिक : 40 फुटांची लाट उसळली आणि 700 लोकांसह 'रामदास' बुडाली