महाराष्ट्राला हुडहुडी : थंडीनं गारठली शहरं

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आणि उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शहरं गारठली आहेत.

मुंबईसुद्धा गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच गारठली आहे. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये मॉर्निंग वॉकला निघताना गरम कपड्यांचा तामझाम करूनच बाहेर पडावं लागतं. नाशिकमध्ये गुरुवारची सकाळ सलग 12 दिवसांनंतर धुक्याविना उजाडली.

Image copyright Sagar Kasar
प्रतिमा मथळा पुणे : आला थंडीचा महिना, शेकोटी जरा पेटवा... पारा घटल्यामुळे आता जागोजागी अशा शेकोट्या पेटलेल्या दिसताहेत.
Image copyright Prashant Nanaware
प्रतिमा मथळा मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रम्य सकाळ
Image copyright Sagar Kasar
प्रतिमा मथळा पुणे : उद्यानं गर्दीनं फुलली आहेत.
Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा नाशिक : इतक्या थंडीत! निफाड परिसरातील गोदावरीचं हे दृश्य
Image copyright Pravin Thakare
प्रतिमा मथळा नाशिक : गोदावरीच्या पात्रात भर थंडीत रोइंगचा सराव करणारा खेळाडू
Image copyright Pravin Thakre/BBC
प्रतिमा मथळा सलग 12 दिवसांनंतर गुरुवारी नाशकातली सकाळ धुक्याशिवाय उजाडली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)