सोशल : 'जिथं इंटरनेट नाही तिथं आधारसाठी व्हर्च्युअल IDचा काय उपयोग?'

आधार कार्डा Image copyright Getty Images

गेल्या काही दिवसांपासून 'आधार कार्ड'च्या गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात असताना, UIDAIने त्याला व्हर्च्युअल IDचं कवच देण्याची घोषणा केली आहे. व्हर्च्युअल आयडी 16 अंकांचं असेल.

"आधार कार्डमधली माहिती पूर्णपणे सुरक्षित असून नागरिकांनी याबाबत घाबरण्याची गरज नाही आहे. आधाराची माहिती कोणत्याही व्यक्तीला सहजपणे मिळणं अशक्यच आहे. तरीही आम्ही खाजगी सुरक्षेचे कारणामुळे व्हर्च्युअल ID ची घोषणा केली आहे," असं UIDAIने म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं वाचकांना विचारलं होतं -

जवळपास सगळ्याच वाचकांनी 'नाही' प्रतिक्रिया दिली आहे.

शुभम गौराजे म्हणतात,"व्हर्च्युअल ID कितीही प्रयत्न केले तरी काही उपयोग होणार नाही. आधार, पॅन, रेशन आणि मतदार कार्ज या सर्वांचं मिळून एकच कार्ड का नाही तयार करत."

Image copyright Facebook

शीतलकुमार कांबळे म्हणतात,"नाही, सरकार याचा वापर स्वतःच्या पक्षाच्या वैयक्तिक वापरासाठी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामान्य नागरिकांच्या हालचालींवर आधारच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याची भीती आहे."

तर राजरत्न बनसोडे यांनी आपला एक अनुभव शेअर करत, आधार कार्ड सुरक्षित नाही असं मत व्यक्त केलं आहे. ते सांगतात, "काल मी एक सिमकार्ड घेतलं. त्यांनी फक्त माझा आंगठ्याचा ठसा एका मशीनवर घेतला आणि काही क्षणांत माझ्या आधार कार्डची सर्व माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे आता मी माझ्या हाताचे ठसे जपतोय, याचा कुठेही गैरवापर होऊ शकतो."

Image copyright Facebook

मयूर दीक्षित यांनी, "स्मार्टफोनमुळे तुमचा लोकेशन डेटा, डेमोग्राफिक्स, शॉपिंग प्रेफरंस, इटिंग प्रेफरंस, पॉलिटिकल इन्क्लीनेशन वगैरे आधीच गळतं. आधार गळतीचं काय घेऊन बसलात," असं म्हटलं आहे.

"व्हर्च्युअल ID मिळवणं OTP मिळवण्याइतकं सोपं नाही. त्यासाठी संगणकाची जाण असणं आवश्यक आहे. नसल्यास पुन्हा कुणा जाणकाराची मदत घेणं आलंच. म्हणजे प्रायव्हसीचा बट्ट्याबोळ. शिवाय, जिथं नेट नाही तिथं व्हर्च्युअल IDचा काय उपयोग?" असा सवाल नीरज इंडळकर यांनी विचारला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)