बिग बॉस-11 : मराठमोळी विजेती शिल्पा शिंदेबद्दल 11 गोष्टी

  • सुप्रिया सोगळे
  • बीबीसी हिंदीसाठी
शिल्पा शिंदे

फोटो स्रोत, COLORS

फोटो कॅप्शन,

बिग बॉस शिल्पा शिंदे

प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भाभी जी घर पर हैं'मधल्या अंगुरी भाभी, अर्थात अभिनेत्री शिल्पा शिंदे यंदाची बिग बॉस-11 शोची विजेती ठरली आहे.

रविवारी सायंकाळी पुण्याजवळच्या लोनावळामध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत शिल्पाने दुसऱ्या एका टीव्ही अभिनेत्रीवर, हिना खानवर मात केली. हिना खान ही 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या टीव्ही मालिकेत अक्षराच्या भूमिकेत होती.

अंतिम फेरीत बिग बॉसचा होस्ट सलमान खानसह अभिनेता अक्षय कुमारही सहभागी झाला होता.

बिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने आणखी एक घोषणा केली. ती म्हणजे, 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. सध्या काही वृत्तांमधून अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्रसंचालन करणार असल्याचं पुढे येत आहे.

सोशल मीडियासून तर घरोघरी चर्चेत राहणाऱ्या या शोची विजेती मराठमोळी शिल्पा ठरली. जाणून घेऊया शिल्पाच्या या विजयाविषयी काही मनोरंजक गोष्टी :

1. बिग बॉस हा अमेरिकन रिअॅलिटी शो बिग ब्रदरच्या धर्तीवर आधारित एक शो आहे, ज्यात काही चर्चेत राहणारे चेहरे एक बंदीस्त घरात शंभरहून अधिक दिवसांसाठी राहतात. कलर्स चॅनलवर येणाऱ्या या शोचा यंदा 11वा सिझन होता.

2. बिग बॉस विजेत्याला एक ट्रॉफी आणि 50 लाख रोख रक्कम मिळणार होती. पण ही रक्कम नंतर कमी होऊन 44 लाख झाली, कारण एका टास्कमध्ये विकास गुप्ता या रकमेपैकी 6 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडला.

3. शिल्पा शिंदे 105 दिवस बिग बॉसच्या घरात होती. रविवारी झालेल्या अंतिम फेरीतही घरातून काही स्पर्धकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच होती.

4. रविवारी घरातून सर्वांत आधी बाहेर पडलेला पुनीष शर्मा चौथ्या क्रमांकावर राहिला. त्यानंतर बाहेर पडलेला विकास गुप्ता तिसऱ्या क्रमांकावर राहिला. अखेर जेतेपदासाठी शिल्पा शिंदे आणि हिना खान यांच्यात मोठी चुरस होती.

बिग बॉस-11च्या अंतिम फेरीतील स्पर्धक

फोटो स्रोत, COLORS PR

फोटो कॅप्शन,

बिग बॉस-11च्या अंतिम फेरीतील स्पर्धक

Skip podcast promotion and continue reading
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of podcast promotion

5. 1999मध्ये करीअरची सुरुवात करणारी शिल्पा शिंदे हिचं नाव गाजलं ते 'भाभीजी घर पर हैं' या मालिकेनं. यात तिची अंगुरी भाभीची भूमिका आणि तिच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे चर्चेत राहिली. पण निर्मात्यांसमवेत झालेल्या वादामुळे तिने 2016ला ही मालिका सोडली.

6. शिल्पा शिंदेने या मालिकेच्या निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या निर्मात्याने हे आरोप नाकारले आहेत.

7. त्या मालिकेतून बाहेर पडल्यावर बराच वेळ तिच्याकडे कुठला मोठा प्रोजेक्ट नव्हता. 'पटेल की पंजाबी शादी' या सिनेमात तिनं एक आयटम साँग केलं आहे. याशिवाय ती 'चिडिया घर' या मालिकेसह अनेक मालिकांमध्ये मोठ्या भूमिकांमध्ये होती.

8. बिग बॉस-11मध्ये शिल्पा शिंदे आणि विकास गुप्ता यांच्यात पहिल्या दिवसापासून वादावादी दिसून आली. यामागे 'भाभीजी घर पर है' ही मालिका कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. होस्ट सलमान खानच्या देखतही दोघांमध्ये वाद झाला होता.

9. उपविजेती ठरलेली हिना खान हिने बिग बॉसच्या घरात शिल्पा आणि अर्शी खान यांना बॉडी शेम केलं, त्यांच्या शरीरावरून त्यांची थट्टा केली. तिने एकदा त्यांना 'कॉल गर्ल'ही म्हटलं होतं, ज्यावरून ट्विटरवर हे प्रकरण ट्रोलही झालं होतं.

10. शिल्पा शिंदे बिग बॉस-11मधील सर्वांत वयस्कर स्पर्धक होती. त्यामुळे या शोमध्ये शिल्पाने अर्शी खान आणि आकाश ददलानीच्या आईची भूमिका स्वीकारली होती.

बिग बॉस-11

फोटो स्रोत, Colors

11. पण एकदा या शोमध्ये आकाशने शिल्पाच्या गालावर चुंबन घेतलं. यावर आकाशला विचारणा झाली तेव्हा तो म्हणाला की परदेशात लहानाचा मोठा झाल्यानं त्याला कदाचित त्यात काही वावगं वाटलं नाही, आणि त्याला शिल्पामध्ये कसलाही रस नाही.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)